Ration Card EKYC Maharashtra 2026: Last Date जवळ आली! तुमचे Online Status आजच चेक करा, अन्यथा रेशन बंद होईल?

Ration Card eKYC Maharashtra: नमस्कार मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र मध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे देखील रेशन कार्ड असेल आणि महत्त्वाचं म्हणजे त्या रेशन कार्ड वरती तुम्हाला महाराष्ट्र सरकार कडून दर महिन्याला स्वस्त धान्य मिळत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे कारण महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने 2026 मध्ये Ration Card Ekyc प्रक्रिया अतिशय गांभीर्याने राबवण्यास सुरुवात केली आहे.

आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये एकच चर्चा आहे ते म्हणजे EKYC जर तुम्ही केली नाही तर तुमच्या रेशन बंद होणार आणि हो मित्रांनोहे खरे आहे महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार जर लाभार्थ्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर त्यांचे नाव हे रेशन कार्ड मधून कायमचे वगळण्यात येईल आणि त्यांना मिळणारे मोफत रेशन तसेच सवलतीचे धान्य कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.

eKYC करणे का अनिवार्य आहे?

बऱ्याच लोकांना एकच प्रश्न पडला की EKYC प्रक्रिया पूर्ण करणे हे का महत्वाचे आहे तर बघा शासनाच्या नवीन अपडेट नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक बोगस रेशन कार्डधारक आहेत जे पात्र नसताना सुद्धा धान्याचा लाभ घेत आहेत या बोगस लाभार्थ्यांना शोधून काढण्यासाठी आणि खरोखर गरजू गरीब लोकांनाच मोफत धान्य मिळावे यासाठी सुप्रीम कोर्ट आणि केंद्र शासनाच्या आदेशानुसार ‘One Nation One Ration Card’ अंतर्गत eKYC करणे अनिवार्य (Mandatory) करण्यात आले आहे. आणि 2026 मध्ये ही मोहीम आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे आणि ही तुमच्यासाठी शेवटची संधी देखील असू शकते.

म्हणूनच मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून Mobile वरून Online Ration Card eKYC करण्याची सोपी पद्धत समजून घेणार आहोत तसेच तुमची EKYC झाली की नाही आणि त्याचे स्टेटस कसे तपासायचे हे देखील अगदी स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे EKYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे हे देखील या लेखांमध्ये मी तुम्हाला समजून सांगितला आहे तर मग चला जराही वेळ न वाया घालवता रेशन कार्ड EKYC प्रक्रिया समजून घेऊया.

Ration Card eKYC Maharashtra 2026

कार्यक्रमतारीख/स्थिती (Date/Status)
योजनेचे नावरेशन कार्ड आधार eKYC लिंकिंग (One Nation One Ration Card)
राज्यमहाराष्ट्र
प्रक्रिया सुरु होण्याची तारीखसुरु झाली आहे
eKYC Last Date31 जानेवारी 2026 (अपेक्षित)
Online Status CheckMERA RASHAN APP
Official Websitemahafood.gov.in

Ration Card eKYC म्हणजे नक्की काय?

बर बघा eKYC म्हणजे ‘Electronic Know Your Customer’ आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रेशन कार्ड मधील लाभार्थी आणि आधार कार्ड मधील व्यक्ती एकच आहे की नाही याची डिजिटल परताळणी करण्यासाठी तुमच्याकडून ही ekyc प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाते यामध्ये रेशन दुकानातील point of sale मशीनवर तुमचा अंगठा किंवा बोट ठेऊन biometric verfication केले जाते आणि यामुळेच सिद्ध होते की लाभार्थी जिवंत आहे आणि तोच लाभार्थी व्यक्ती मोफत धान्याचा लाभ घेत आहे.

कोणाला eKYC करणे अनिवार्य आहे?

  • तुमच्या घरामध्ये जेवढे देखील सदस्य असतील म्हणजेच ज्या ज्या सदस्यांची नावे रेशन कार्ड मध्ये जोडली गेली आहे अशा प्रत्येक सदस्यांनी रेशन धान्य दुकानात जाऊन वैयक्तिकरित्या बोटाचा ठसा देऊन ekyc पूर्ण करायची आहे.
  • जर तुमच्या घरात लहान मुले मुली असतील आणि त्यांचे रेशन कार्ड वर नाव असेल आणि त्यांचे आधार कार्ड बनले असेल तर त्यांना देखील ekyc पूर्ण करणे गरजेचे आहे.
  • आणि महत्त्वाचे म्हणजे One Nation One Ration Card योजनेअंतर्गत तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठेही असाल तरी जवळच्या रेशन धान्य दुकानात जाऊन तुम्ही EKYC पूर्ण करू शकता.

eKYC न केल्यास काय होईल?

  • जर तुम्ही EKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर ज्या विशिष्ट सदस्याची EKYC पूर्ण झाली नसेल त्याचे नाव रेशन कार्ड मधून डिलीट केले जाईल.
  • आणि महत्त्वाचं म्हणजे धान्यामध्ये कपात होईल बघा समजा तुमच्या घरामध्ये चार माणसे आहेत आणि त्यामध्ये फक्त दोन जणांनी EKYC पूर्ण केली असेल तर पुढील महिन्यात फक्त त्या दोन जणांचे धान्य देण्यात येईल आणि बाकीच्या सदस्यांचे धान्य बंद होईल.
  • जर कुटुंबातील एकाही व्यक्तीने EKYC पूर्ण केली नाही तर ते रेशन कार्ड अस्तित्वातच नाही किंवा बोगस आहे असं समजून सरकारमार्फत ते रेशन कार्ड पूर्णपणे रद्द देखील केल्या जाऊ शकते.

Ration Card eKYC Process 2026: स्टेप-बाय-स्टेप संपूर्ण माहिती

मित्रहो, eKYC प्रक्रिया दोन टप्प्यात समजून घेणे गरजेचे आहे. १) रेशन दुकानात जाऊन eKYC करणे आणि २) घरबसल्या मोबाईलवर स्टेटस चेक करणे.

रेशन दुकानात जाऊन eKYC कशी करावी? (Offline Process)

  • या सदस्यांची नावे रेशन कार्ड वरती आहेत अशा सर्व सदस्यांनी जवळच्या रेशन धान्य दुकानात जाणे आवश्यक आहे जर एकाच वेळी सर्वांना जाणे शक्य नसल्यास तुम्ही वेगवेगळ्या वेळेमध्ये गेले तरी चालेल.
  • आता सोबत जाताना तुम्हाला तुमचे रेशन कार्ड आणि प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड घेऊन जावे लागेल.
  • त्यानंतर रेशन दुकानदाराकडे असलेल्या Point of Sale मशीन मध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकला जाईल.
  • त्यानंतर सेन्सरवर तुम्हाला तुमचा अंगठा किंवा बोट ठेवून BIOMETRIC AUTHENTICATION पूर्ण करायचे आहे.
  • आता मशीन वरती MATCHED किंवा SUCCESS असा मेसेज दिसेल तर समजून जावे की तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

NOTE: मित्रांनो ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला राशन धान्य दुकानांमधील दुकानदाराला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही कारण ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

Mera Ration App वापरून Status चेक करण्याची पद्धत (Mobile Process)

आता अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की घरी बसून मोबाईल वरती EKYC प्रक्रिया पूर्ण करता येते का? तर मित्रांनो याचे उत्तर सरळ नाही आहे कारण तुम्हाला बायोमेट्रिक देण्याकरिता स्वस्त राशन धान्य दुकानांमध्ये जावेच लागते पण जर तुमची EKYC प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे की नाही हे जर तुम्हाला तपासायचे असेल तर हे तुम्ही MERA RATION APP मध्ये घरबसल्या अगदी सहज पद्धतीने तपासू शकता आणि जर तिथे YES असे दिसले तर तुम्हाला दुकानदाराकडे जाण्याची गरज नाही.

Step-by-Step Process

  • सर्वप्रथम Google Play Store वरून Mera Ration’ (Central Govt App) डाऊनलोड करा.
  • आता मित्रांनो App ओपन करा आणि तुमची भाषा निवडा (English/Hindi/Marathi).
  • यानंतर होमपेजवर तुम्हाला ‘Aadhar Seeding’ नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • तेथे दोन पर्याय असतील – ‘Ration Card Number’ किंवा ‘Aadhar Number’. यातील Ration Card Number निवडा आणि नंबर टाकून Submit करा.
  • मित्रांनो आता तुमच्यासमोर घरातील सर्व सदस्यांची नावे येतील.
  • नावासमोर ‘Aadhar Seeding’ च्या खाली ‘Yes’ लिहिले असेल, तर तुमची eKYC पूर्ण झाली आहे.
  • जर ‘No’ लिहिले असेल, तर तुम्हाला तात्काळ रेशन दुकानात जाऊन वर दिलेल्या ‘पद्धत १’ नुसार eKYC करावी लागेल.

MahaFood Website वर eKYC Status Check Online

जर तुमच्याकडे App नसेल, तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनही खात्री करू शकता.

  • Google वर ‘MahaFood RCMS’ सर्च करा किंवा rcms.mahafood.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
  • मुख्य मेनूमध्ये ‘Know Your Ration Card’ किंवा ‘Rashan Card Details’ या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे Captcha Code टाका आणि Verify करा.
  • तुमचा Ration Card Number (SRC Number) एंटर करा आणि View Report वर क्लिक करा.
  • तुमच्या रेशन कार्डची संपूर्ण माहिती ओपन होईल. तिथे ‘Member Details’ मध्ये ‘UID Status’ तपासा. जर तिथे ‘Seeded’ किंवा ‘Available’ असेल, तर तुमचे काम झाले आहे.

 eKYC साठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required)

कागदपत्राचे नावकोणाचे आवश्यक?महत्त्वाची टीप
Aadhar Cardकुटुंबातील सर्व सदस्यांचेओरिजिनल आधार कार्ड सोबत ठेवावे (Biometric साठी).
Ration Cardकुटुंब प्रमुखाचेरेशन कार्ड क्रमांक (RC No) देण्यासाठी आवश्यक.
मोबाईल नंबरतुमचा जो नंबर आधार कार्डला लिंक आहे, तो सोबत ठेवावा (OTP साठी लागू असल्यास).
शिधापत्रिका धारकसर्व सदस्यeKYC साठी सर्व सदस्यांना (ज्यांचे नाव कार्डवर आहे) दुकानात स्वतः हजर रहावे लागेल.

Ration Card eKYC बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी सध्या गावी नाही, तर दुसऱ्या जिल्ह्यातून eKYC करू शकतो का?

हो मित्रांनो नक्कीच One Nation One Ration Card योजनेमुळे तुम्ही महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये कोणत्याही स्वस्त रेशन धान्य दुकानात जाऊन तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या मूळ गावी जाण्याची गरज नाही.

माझे Fingerprints मशीनवर येत नाहीत, मी काय करावे?

अनेक वेळा वयस्कर लोकांमध्ये ही समस्या येते आता अशावेळी तुम्ही रेशन धान्य दुकानदाराला डोळ्यांचे स्कॅनिंग वापरण्यासाठी विनंती करू शकता तरीही अडचण असल्यास तुम्ही आधार सेंटरला जाऊन तुमचे बायोमेट्रिक अपडेट करून घेऊ शकता आणि त्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

Ration Card eKYC करण्यासाठी किती फी किंवा पैसे लागतात?

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की केवायसी प्रक्रिया ही सेवा महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे मोफत केली आहे त्यामुळे रेशन धान्य दुकानदाराला केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकही रुपये देण्याची गरज नाही.

Conclusion

मित्रांनो शासनाच्या नियमानुसार रेशन कार्ड आधार कार्ड ची लिंक करणे आता अनिवार्य झाले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे 31 जानेवारी 2026 याची अंतिम मुदत आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अंतिम मुदतीची वाट न बघता तुम्ही केवायसी प्रक्रिया वेळेवर पूर्ण करून घ्या कारण शेवटच्या दिवशी सर्व्हर (Server) डाऊन होण्याच्या दाट शक्यता असतात.

आणि महत्त्वाचे म्हणजे आजच तुमच्या मोबाईल मधील MERA RATION APP तपासा आणि खात्री करा की तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही एप्लीकेशन मध्ये जर YES लिहून येत असेल तर तुम्हाला केवायसी करण्याची काही गरज नाही आणि जर NO येत असेल तर तात्काळ जवळच्या रेशन धान्य दुकानात जाऊन दहा मिनिटांमध्ये तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

आणि हो मित्रांनो हे माहिती तुमच्या गरजू गरीब मित्रांपर्यंत देखील शेअर करा तुमच्या जवळच्या व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा जेणेकरून कोणाचेही हक्काचे रेशन बंद होणार नाही.

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *