
मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आजारपण कधी येईल हे सांगता येत नाही जेव्हा आपल्याला एखादी गंभीर वैद्यकीय समस्या उद्भवते तेव्हा केवळ शारीरिक त्रासच होत नाही तर त्याहून अधिक मानसिक तणाव देखील येतो आणि हा रुग्णालयाच्या वाढत्या विलंबाचा असतो अनेक भारतीयांना आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयाचा खर्च झेपत नाही आणि भारताच्या आजच्या घडीला खाजगी रुग्णालयातील उपचार आणि औषधीचा खर्च तर गगनाला भिडलेला आहे अशातच अनेकदा घरातील कर्त्या व्यक्तीला किंवा वृद्ध आई-वडिलांना एका चांगल्या उपचाराची गरज असते पण पैशांच्या अभावी सर्वसामान्य माणसाला तडजोड करावी लागते आणि कित्येकदा उपचारासाठी कर्जबाजारी देखील व्हावे लागते.
पण आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण सर्वसामान्यांच्या आरोग्याची हीच अडचण ओळखून भारत सरकारने आयुष्मान भारत योजना ही गरजू गरीब लोकांसाठी सुरू केली आहे ही योजना देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी जणू काही वरदानच ठरली आहे.
आणि या योजनेमधील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपये पर्यंतचा उपचार हा अगदी मोफत मिळतो म्हणजेच आजार कोणताही असो तो आता पैशांच्या अभावी थांबणार नाही आणि याचीच हे कार्ड हमी देते जर तुम्ही अजूनही आयुष्मान भारत कार्ड काढले नसेल तर आजच आयुष्मान कार्ड ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करून तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य अगदी सुरक्षित करू शकता तर मग चला समजून घेऊया की आयुष्यमान भारत कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे यासाठी अर्ज कसा करायचा आणि याचे फायदे काय आहेत.
Overview: Ayushman Bharat Yojana 2025
| तपशील (Details) | माहिती (Information) |
|---|---|
| योजनेचे नाव | आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) |
| कोणी सुरू केली? | केंद्र सरकार (राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण – NHA) |
| लाभार्थी | देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबे |
| आरोग्य संरक्षण (Benefit) | ₹5 लाख (प्रति कुटुंब / प्रति वर्ष) |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
| हेल्पलाइन नंबर | 14555 / 1800-111-565 |
| अधिकृत वेबसाईट | pmjay.gov.in |
योजना काय आहे?
तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबांना मोफत आणि दर्जेदार उपचाराची सुविधा देणे असा आहे या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंत उपचार पहा अगदी मोफत मिळतो आणि यामध्ये मोठ्या शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा खर्च तसेच तपासण्या औषधी आणि उपचारानंतरचा खर्च देखील समाविष्ट असतो आयुष्मान भारत योजनेमुळे लोकांना आजारपणामुळे कर्ज काढण्याची किंवा त्यांची मालमत्ता विकण्याची गरज पडत नाही.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र सरकारने ही योजना 2018 साली सुरू केली जी आज जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना म्हणून ओळखली जाते कारण या योजनेत कोट्यावधी कुटुंबांचा समावेश असून भारतभर हजारो सरकारी व खाजगी रुग्णालय जोडलेली आहे तसेच कोणताही प्रीमियम न भरता इतक्या मोठ्या रकमेचे आरोग्य संरक्षण देणारी हे जग महत्त्वाची योजना मानली जाते त्यामुळे घरी मजूर ग्रामीण भागातील नागरिक तसेच असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने जीवन संरक्षण ठरली आहे.
आयुष्यमान कार्डसाठी पात्रता निकष
मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम हे माहिती असणे आवश्यक आहे की आयुष्यमान भारत योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो यासाठी पात्रता व निकष काय आहे तर बघा सरकारने ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळे निकष ठरवले आहे आता तुमचे नाव या पात्रता यादीमध्ये बसत आहे की नाही हे तुम्ही खाली दिलेल्या निकषावरून अगदी सहज पद्धतीने तपासू शकता.
ग्रामीण भागासाठी पात्रता
- ज्यांच्याकडे कच्चे घर आहे (केवळ एक खोली आणि कच्च्या भिंती/छप्पर).
- ज्या कुटुंबात १६ ते ५९ वयोगटातील कोणीही कमावता पुरुष सदस्य नाही.
- अशी कुटुंबे ज्यांची मुख्य जबाबदारी घरातील स्त्री सांभाळते.
- अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील कुटुंबे.
- भूमिहीन कुटुंबे जे उदरनिर्वाहासाठी मजुरीवर अवलंबून आहेत.
- निराधार, भिकारी किंवा जे लोक भिक्षा मागून जीवन जगतात.
शहरी भागासाठी पात्रता
- रिक्षाचालक, टेम्पो चालक
- सफाई कर्मचारी
- मोलकरीण / घरकाम करणारे
- बांधकाम कामगार
- हातगाडी / फेरीवाले
- प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार
- सुरक्षा रक्षक
- दैनंदिन मजूर
- कचरा वेचक
कोण पात्र नाही?
- चारचाकी वाहन असलेले
- दुचाकी + शेती अवजारे असलेले
- सरकारी नोकरीत असलेले
- Income Tax भरत असलेले
- 5 एकरपेक्षा जास्त सिंचनयोग्य जमीन असलेले
- पक्के घर + स्थिर उत्पन्न असलेले
- व्यवस्थित व्यवसाय किंवा मोठे दुकान असलेले
आयुष्यमान भारत योजनेचे लाभ आणि वैशिष्ट्ये
मित्रांनो आयुष्मान भारत योजना ही सर्वात मोठी सरकारी योजना म्हणून ओळखली जाते या योजनेअंतर्गत गरिबांना उत्तम आरोग्याची हमी मिळते तसेच या योजनेअंतर्गत आणखी तुम्हाला कोणते लाभ मिळू शकतात आणि या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत हे आम्ही खालील प्रमाणे अगदी व्यवस्थितरीत्या समजून सांगितली आहे.
हे नक्की वाचा: 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार 8000 रुपये, पालकांनो आजच अर्ज करा
Free Cover up to ₹5 Lakhs
आयुष्मान भारत योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाकाठी पाच लाख रुपया पर्यंतचे आरोग्य उपचार अगदी मोफत मिळतात म्हणजे हे पाच लाख रुपये तुम्हाला परत करावे लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये लहान आजारापासून ते बायपास सर्जरी किडनी ट्रान्सप्लांट कॅन्सर उपचार असे 1300 हून अधिक उपचार तुम्हाला घेता येतात.
Cashless & Paperless Treatment
रुग्णालयामध्ये गेल्यावरती अनेकदा डॉक्टर आपल्याला सर्वात आधी डिपॉझिट भरायला सांगतात पण आयुष्मान कार्ड असल्यास तुम्हाला एकही रुपया खिशातून खर्च करण्याची गरज भासत नाही रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंत सर्व खर्च म्हणजेच तपासण्या औषधी डॉक्टरची फी आणि जेवणाचा खर्च हे सरकार उचलते आणि ते पूर्णपणे कॅशलेस आहे.
Access to Private Hospitals
मित्रांनो बऱ्याचदा सरकारी रुग्णालयात सुविधांचा अभाव असतो आणि गर्दी देखील असते पण आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तुम्ही केवळ सरकारीच नाही तर सरकारने निवडलेल्या नामांकित खाजगी रुग्णालयांमध्ये देखील उपचार घेऊ शकता यामुळे गरिबांना फाईव्ह स्टार दर्जाच्या सुविधा मिळतात आणि त्यांच्यासाठी उपचार घेणे अगदी सोपे होते.
No Cap on Family Size
विमा योजनांमध्ये पाच लाखापेक्षा जास्त सदस्य असल्यास संरक्षण मिळत नाही मात्र आयुष्मान भारत योजनेत कुटुंबाचा आकार सदस्याचे वय किंवा लिंग याचे कोणतेही बंधन नाही म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्य अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध आजी आजोबा पर्यंत असे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- आधार लिंक असलेला मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
Ayushman Card Online Apply 2025: घरबसल्या अर्ज करा (Step-by-Step Process)
- आयुष्मान भारत कार्ड साठी अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राउझरमध्ये https://beneficiary.nha.gov.in/ अधिकृत वेबसाईट ओपन करा.
- वेबसाईट ओपन झाल्यावरती तुमच्यासमोर बेनिफिशियरी आणि ऑपरेटर असे दोन पर्याय दिसतील.
- सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला बेनिफिशरी हा पर्याय निवडायचा आहे.
- आता तुमचा मोबाईल नंबर दिलेल्या रकान्यामध्ये टाका आणि समोर व्हेरिफाय बटन वरती क्लिक करून व्हेरिफाय करा.
- तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो व्यवस्थित रित्या भरा.
- आता खाली दिलेल्या कॅप्चा कोड व्यवस्थित रित्या भरा आणि लॉगिन बटन वरती क्लिक करून लॉगिन करा.
- लॉगिन पेज उघडल्यानंतर तुम्हाला खाली दिलेले पर्याय निवडायचे आहेत जसे की तुमचे राज्य योजना म्हणजेच (PMJAY), त्यानंतर जिल्हा, आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून सर्च आयकॉनवर क्लिक करा.
- आता तुम्हाला ज्या सदस्याचे कार्ड काढायचे आहे त्याच्या नावासमोर ॲक्शन या कॉलम मध्ये एका छोट्याशा आयकॉन वरती क्लिक करा.
- आता आधार ऑथेंटीकेशन हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यावर्ती तुम्हाला आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो व्हेरिफाय करावा लागेल.
- आता तुमची केवायसी प्रक्रिया सुरू होईल यामध्ये तुमचा आधार वरील फोटो आणि माहिती स्क्रीनवर दिसेल.
- आता तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो काढायचा आहे हा फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेराने काढू शकता.
- तुमचा आधार वरील डेटा आणि आताचा डेटा किती जुळतोय याचा स्कोर सिस्टीम मध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल जर हा स्कोर 80 पेक्षा जास्त असेल तर फारच चांगले.
- आता खाली विचारलेली अतिरिक्त माहिती जसे की मोबाईल नंबर जन्मतारीख पिन कोड अगदी व्यवस्थित रित्या भरा आणि सबमिट बटन वरती क्लिक करा.
- सबमिट केल्यावर ती बहुतेक वेळा कार्ड ऑटो अपूर्व होते अपूर्वक मिळाल्यावर तुम्हाला डाऊनलोड कार्ड असा हिरव्या रंगाचा पर्याय दिसेल तर त्यावर क्लिक करा आणि तुमचे पाच लाख रुपयाचे आयुष्यमान कार्ड पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घ्या.
आयुष्यमान भारत योजना: नवीन अपडेट्स
आयुष्मान भारत योजनेच्या नवीन अपडेट नुसार आता 70 वर्षापेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कोणत्याही उत्पन्नाची अट नाही जेष्ठ नागरिक गरीब असो किंवा श्रीमंत त्याचे उत्पन्न कितीही असले तरी त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
तसेच ज्या नागरिकांच्या मोबाईल मध्ये आयुष्मान भारत योजनेचे जुने ॲप आहे ते आता बंद झाले आहे भारत सरकारने नवीन आयुष्मान ॲप लॉन्च केले आहे हे ॲप वापरायला अगदी सोपी आहे याद्वारे तुम्ही फेस ऑथेंटीकेशन करून तुमची ई केवायसी कम्प्लीट करू शकता.
आणि या वर्षातील सर्वात मोठा अपडेट म्हणजे आता तृतीय पंथ समुदायालाही या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचा संरक्षण विमा देण्यात येणार आहे याच्यासाठी लिंग बदलाच्या शस्त्रक्रियांचाही समावेश काही पॅकेज मध्ये करण्यात आला आहे.
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs
One comment
Pingback: 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार 8000 रुपये, पालकांनो आजच अर्ज करा - swarajupdates.in