तुमचे PAN Card ‘Inactive’ होईल! Aadhaar-PAN Link करा..!

Aadhaar-PAN Link Full process: नमस्कार मित्रांनो आजच्या डिजिटल युगामध्ये PAN CARD आणि AADHAR CARD ही दोन अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे झाली आहेत जर तुम्ही दोन्हीही एकामेकांशी लिंक केलेली नसतील तर तुमचे पॅन कार्ड काढूनही काही उपयोग नाही. होय मित्रांनो हे खर आहे भारत सरकारने पॅन कार्ड ला आधार कार्ड ची लिंक करणे आता अनिवार्य केला आहे.

पण हे दोन्हीही डॉक्युमेंट लिंक करणे का महत्त्वाचा आहे ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लेख नसेल तर तुमचे पॅन कार्ड हे निष्क्रिय केले जाते याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स भरू शकणार नाही तुम्हाला कोणताही टॅक्स रिफंड मिळणार नाही आणि यासोबतच तुम्ही बँकेतील व्यवहारामध्ये पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त ट्रांजेक्शन करू शकणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेत नवीन खाता देखील उघडू शकणार नाहीत याचा अर्थ असा होतो की जर तुमचा पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक असेल तर तुमची कोणतीही आर्थिक कामे होणार नाहीत.

मित्रांनो हे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करण्याची सरकारने एक शेवटची मुदत देखील ठरवून दिलेली आहे त्याच्यासाठी आता ही प्रक्रिया मोफत राहिली नाही सध्या तरी पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी तुम्हाला हजार रुपये पर्यंतचा दंड भरावा लागू शकतो सरकारने हा दंड भरून लिंकिंग पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत निश्चित केली आहे जर तुम्ही या तारखेपर्यंतही हे काम पूर्ण केलं नाही तर एक जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड परमनंटली निष्क्रिय केले जाईल.

पण मित्रांनो घाबरू नका तुम्ही हा हजार रुपये दंड भरून देखील घरबसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करू शकता आणि याच्या सोप्या स्टेप आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Aadhaar-PAN Link Overview

विषय (Parameter)माहिती (Details)
विभाग (Department)आयकर विभाग, भारत सरकार (Income Tax Dept.)
मुख्य उद्देश (Purpose)करचोरी रोखणे, बोगस पॅन कार्ड रद्द करणे आणि आर्थिक व्यवहार प्रमाणित करणे.
विलंब शुल्क (Late Fee)₹1000 (एक हजार रुपये)
अधिकृत वेबसाइट (Official Website)https://www.incometax.gov.in/

What is Aadhaar-PAN Link?

मित्रांनो पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे हे एक सरकारी प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुमचा एक कायमचा खाते नंबर तुमच्या आधार कार्डशी जोडला जातो. म्हणूनच भारत सरकारच्या आयकर विभागाने हा नियम सर्व भारतीयांसाठी अनिवार्य केला आहे तसेच हा नियम लागू करण्यात मागचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील इन्कम टॅक्स सिस्टीम अधिक पारदर्शक करणे असा आहे कारण यापूर्वी अनेक लोक कर चुकवण्यासाठी किंवा आर्थिक घोटाळे करण्यासाठी एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बनवत होते आता पॅन कार्ड घे आधार कार्ड सोबत लिंक केल्यामुळे एका व्यक्तीला एकच पॅन कार्ड मिळाला आहे हे सुनिश्चित करता येईल यामुळे सरकारला TAX EVASION थांबवता येईल आणि प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारावर अचूक लक्ष ठेवता येईल ज्यामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण आर्थिक व्यवहार हे पारदर्शक आणि सुरक्षित बनतील.

Aadhaar-PAN Link Objectives and Importance

तर बघा भारत सरकारची पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यामागे दोन उद्दिष्टे आहेत पहिले म्हणजे टॅक्स चोरीला आळा घालणे आणि दुसरे म्हणजे जे लोक एकापेक्षा जास्त बोगस पॅन कार्ड तयार करतात याला कायमचे बंद करणे कारण अनेक लोक एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तयार करून आपले उत्पन्न विभागून दाखवत असतात ज्यामुळे त्यांना कर वाचवण्यात मदत होते पण आता पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक केल्यामुळे त्या व्यक्तीच्या नावावर फक्त एकच पॅन कार्ड ऍक्टिव्ह राहू शकते ज्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये शंभर टक्के पारदर्शकता येते आणि एका सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टीने हे लिंकिंग करणे केवळ कायद्याचे पालन करणे नाही

तर ती एक आर्थिक गरज आहे जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केले नसेल तर ते काही काळानंतर निष्क्रिय मानले जाते याचा परिणाम थेट तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न वर होऊ शकतो म्हणजे तुम्ही भविष्यात इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाही तसेच तुम्हाला मिळणार कोणताही रिफंड अडकून पडेल आणि बँकेमध्ये मोठी देवाणघेवाण करायची असल्यास तसेच इतर ठिकाणी पैशाची गुंतवणूक करताना तुम्हाला आर्थिक अडचणी देखील येऊ शकतात थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला जर तुमचे पॅन कार्ड हे ऍक्टिव्ह ठेवायचे असेल आणि तुमची सर्व आर्थिक कामे अगदी सुरळीतपणे चालू ठेवायची असतील तर हे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग करणे अत्यंत महत्त्वाची आहे.

आधार-पॅन लिंक: कोणासाठी अनिवार्य आणि कोणाला सूट?

तर बघा INCOME TAX ACT 1961 नुसार भारतामध्ये राहणाऱ्या ज्या भारतीयांकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड दोन्ही आहेत त्या प्रत्येक भारतीयाला हे लिंक करणे मेडिटरी केला आहे जर तुम्ही भारतात राहत असाल तसेच इन्कम टॅक्स भरत असाल किंवा इतर मोठे आर्थिक व्यवहार करत असाल तर तुम्हाला हा नियम लागू होतो.

मित्रांनो भारत सरकारने काही विशिष्ट गटातील व्यक्तींना या लिंकिंग मधून सूट दिली आहे यातून सूट मिळालेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने अनिवासी भारतीय जे लोक भारताचे रहिवासी नाही किंवा त्यांचे वय 80 किंवा त्यापेक्षा अधिक आहे म्हणजेच ते सुपर सीनियर सिटीजन आहेत आणि या सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोक आसाम मेघालय व जम्मू काश्मीर या राज्यांमधील रहिवासी आहेत तसेच जे व्यक्ती भारताचे नागरिक नाहीत अशा व्यक्तींना पॅन कार्ड आणि आदर करणे लिंक करणे सध्यातरी अनिवार्य केलेले नाही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर तुम्ही या सूट मिळालेल्या श्रेणीमध्ये येत नसाल तर तुमचे पॅन कार्ड हे ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला पण आणि आधार लिंक करणे बंधनकारक आहे.

Consequences – No Financial Benefits

  • तर मित्रांनो यामधील सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचे पॅन कार्ड इनऍक्टिव्ह होते आयकर विभागाच्या नियमानुसार पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक न केल्यास निष्क्रिय मानले जाते पॅन कार्ड निष्क्रिय होण्याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करू शकणार नाही.
  • टॅक्स रिफंड अडकणे मित्रांनो तुमचा जर कोणताही टॅक्स रिफंड येणे बाकी असेल तर तो पॅन कार्ड निष्क्रिय असल्यामुळे तुम्हाला मिळू शकणार नाही.
  • एक हजार रुपये लेट फी मित्रांनो जर तुम्हाला निष्क्रिय पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करायचं असेल तर ते ऍक्टिव्ह करण्यासाठी आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य असते आणि तुम्हाला हे ऍक्टिव्ह जर करायचं असेल तर त्यासाठी हजार रुपये दंड किंवा विलंब शुल्क हे भरावे लागते आणि हा एक प्रकारचा आर्थिक फटका आहे.
  • वाढीव TDS/TCS (Higher Tax Deduction) मित्रांनो एक मोठा फटका म्हणजे हिडन चार्जेस जेव्हा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होते तेव्हा बँका एफडी वरील व्याजावर किंवा इतर संस्था तुमचा टॅक्स सामान्य दराऐवजी 20% किंवा त्याहून अधिक उच्च दराने कापत असतात.
  • आर्थिक व्यवहारांवर बंदी मित्रांनो पॅन कार्ड निष्क्रिय असल्यामुळे तुम्ही बँकांमध्ये नवीन खाते उघडू शकत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे 50 हजारापेक्षा जास्तीचे आर्थिक व्यवहार देखील करू शकत नाही आणि शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करता येणार नाही.

Aadhaar-PAN Link Required Documents

  • पॅन कार्ड क्रमांक (PAN Card Number): तुमचा १०-अंकी पॅन क्रमांक.
  • आधार कार्ड क्रमांक (Aadhaar Card Number): तुमचा १२-अंकी आधार क्रमांक.
  • आधार-लिंक केलेला मोबाईल क्रमांक (Aadhaar Linked Mobile): हा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण, या मोबाईल नंबरवर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी OTP (One Time Password) येतो.

Aadhaar-PAN Link Application Process & Status Check

मित्रांनो आता पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे अत्यंत सोपे झाले आहे जरी तुम्हाला त्यासाठी शंभर रुपये विलंब शुल्क भरावे लागत असेल तरी आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा SMS च्या माध्यमातून हे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक कसं करायचं याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आता पाहूया:

इन्कम टॅक्स पोर्टलवरून ऑनलाइन (Online) पद्धत

  • मित्रांनो आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे
  • आता वेबसाईटच्या होम पेज वरती तुम्हाला क्विक लिंक नावाचा विभाग शोधायचा आहे.
  • Quick Links मध्ये e-Pay Tax या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला तुमची माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे जसे की तुमचा पॅन कार्ड नंबर यानंतर परत तुम्हाला पॅन कार्ड नंबर कन्फर्म करायचा आहेतुमचा कोणताही एक मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक नसेल तरी चालेल त्यानंतर कंटिन्यू या बटन वरती क्लिक करा आता तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाकून कंटिन्यू करा.
  • ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव दिसेल आता इन्कम टॅक्स या पर्यायासमोरील प्रोसेस या बटन वरती क्लिक करा.
  • पुढील पानावर, ‘Assessment Year’ (AY) निवडा. (उदा. तुम्ही २०२५ मध्ये पेमेंट करत असाल, तर ‘2026-27’ हे वर्ष निवडा.
  • त्याखालील ‘Type of Payment (Minor Head)’ मध्ये ‘Other Receipts (500)’ हा पर्याय निवडा आणि ‘Continue’ करा.
  • पुढील पेज वरती तुम्हाला Others या बॉक्समध्ये तुम्हाला एक हजार रुपये आपोआप दिसतील आता फक्त तुम्हाला कंटिन्यूचे बटन दाबायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर वेगवेगळी पेमेंट करण्याचे पर्याय येतील जसं की नेट बँकिंग, डेबिट कार्ड, पेमेंट गेटवे आता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला पर्याय निवडायचा आहे आणि हजार रुपयांचे पेमेंट पूर्ण करायचे आहेत.
  • झाल्यानंतर त्याची पावती डाऊनलोड करून ठेवा भविष्यामध्ये कामात येईल.

आधार-पॅन लिंक करणे (पेमेंटनंतर ४-५ दिवसांनी)

NOTE: मित्रांनो तुम्ही भरलेले शुल्क इन्कम टॅक्स पोर्टलवर अपडेट होण्याकरिता किमान 48 तास ते चार ते पाच दिवसापर्यंत एवढा कालावधी देखील लागू शकतो त्यामुळे पेमेंट केल्यावर लगेचच लिंक करण्याचा प्रयत्न करू नका.

  • आता परत चार-पाच दिवसांनी थोडी वाट बघून इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल वेबसाईट वरती लॉगिन करायचा आहे.
  • आता यानंतर क्विक लिंक यामधून आधार लिंक या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर Validate या बटन वरती क्लिक करा.
  • जर तुमच्या प्रोफाईल मध्ये हजार रुपयाचे पेमेंट अपडेट झाले असेल तर तुम्हाला Your payment details are verified असा मेसेज येईल.
  • आता LINK करण्यासाठी कंटिन्यू या बटन वरती क्लिक करा.
  • यानंतर तुमचे आधार कार्ड मधील नाव आणि मोबाईल नंबर टाका त्यानंतर आधार लिंक या बटनवर क्लिक करा.
  • आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवण्यात येईल.
  • तो ओटीपी टाकून यानंतर तुमची आधार पॅन लिंक विनंती यशस्वीरित्या सबमिट होईल.

SMS द्वारे लिंकिंग

NOTE: मित्रांनो ही पद्धत तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही हजार रुपये शुल्क ऑनलाईन आधीच भरलेले असते आणि ते पोर्टल वरती यशस्वीरित्या अपडेट झालेली असते.

  • आता तुमचा आधार कार्ड क्रमांक पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबर वरून मेसेज बॉक्स उघडा.
  • यानंतर खाली दिलेल्या मेसेज फॉरवर्ड अगदी व्यवस्थित रित्या टाईप करा UIDPAN<space>[12-अंकी आधार क्रमांक]<space>[10-अंकी पॅन क्रमांक] उदाहरणार्थ: UIDPAN 123456789012 ABCDE1234F
  • पहा मेसेज 567678 किंवा 56161 या अधिकृत नंबर वरती सेंड करा.
  • तुम्ही ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लिंकिंग प्रक्रिया यशस्वी झाली तसा कन्फर्मेशन चा मेसेज येईल.

तुमचे आधार-पॅन लिंक Status कसे तपासावे?

मित्रांनो जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही किंवा तुमची विनंती यशस्वी झाली आहे का हे तपासण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा:

  • यासाठी तुम्हाला पुन्हा incometax.gov.in वेबसाइटवर जायचे आहे.
  • या नंतर ‘Quick Links’ विभागात ‘Link Aadhaar Status’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित रित्या भरा.
  • आता ‘View Link Aadhaar Status’ या बटणावर क्लिक करा.
  • जर तुमचे पॅन-आधार लिंक असेल, तर “Your PAN is already linked to given Aadhaar” असा हिरव्या रंगात मेसेज दिसेल. जर लिंक नसेल, तर तसे तिथे दिसून येईल.

Helpline

DepartmentContact Details
Official Portalhttps://www.incometax.gov.in/
e-Filing Helpline1800 103 0025
1800 419 0025
For e-Pay Tax Issuesepay.helpdesk@incometax.gov.in
Grievanceपोर्टलवर ‘Grievances’ (तक्रारी) विभागात तुमची तक्रार नोंदवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

फी भरल्यानंतर लिंक व्हायला एकूण किती वेळ लागतो?

मित्रांनो तुम्ही जर हजार रुपये फी भरल्यानंतर ते पेमेंट इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये अपडेट होण्याकरिता चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो पेमेंट अपडेट झाल्यानंतर तुम्ही लगेचच आधार कार्ड पॅन कार्ड लिंकिंग साठी फायनल रिक्वेस्ट सबमिट करू शकता यामुळे पेमेंट केल्यावर चार ते पाच दिवस नक्की थांबा मगच आधार कार्ड लिंक पर्यायचा वापर करा

मी NRI आहे / माझे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. मलाही हे बंधनकारक आहे का?

नाही. आयकर कायद्यानुसार, अनिवासी भारतीयांना (NRIs), ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या अति-ज्येष्ठ नागरिकांना (Super Senior Citizens), आणि आसाम, मेघालय व जम्मू-काश्मीरमधील रहिवाशांना या लिंकिंग प्रक्रियेतून सूट (Exemption) देण्यात आली आहे.

Check Also

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना

⬛️  कोणाला लाभ घेता येणार? महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/तरुणींना दिला जाईल. ⬛️ काय …

महिलांसाठी मोठी संधी! मिळवा ₹15 लाख Business Loan, तेही बिनव्याजी!

मित्रांनो आपल्या कुटुंबाला भरभक्कम आधार देण्याकरिता प्रत्येक आई मध्ये आणि प्रत्येक महिलेमध्ये एक यशस्वी उद्योजिका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *