Lek Ladaki Yojana Full Details: Apply Online, Form, कागदपत्रे आणि GR सर्व एकाच ठिकाणी

महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी Lek Ladaki Yojana नावाची एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून तर त्यांच्या शिक्षणापर्यंत मुलींच्या कुटुंबाला तसेच मुलींना आर्थिक मदत देण्यात येते Lek Ladaki Yojana ही प्रत्येक टप्प्यावर आर्थिक हातभार लावणारी एक महत्त्वपूर्ण योजना मानली जाते आणि महत्त्वाचे म्हणजे मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे तसेच त्यांचे शिक्षण थांबून नये आणि पालकांकडून मुलींच्या भविष्याची चिंता मिटावी याच हेतूने ही योजना सुरू करण्यात आली.

तसेच मुलीच्या जन्मापासून ते मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून टप्प्याटप्प्याने मुलींच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते यामुळे त्यांच्या पालकांवरील खर्चाचे ओझे तर कमी होतेच आणि या सोबतच मुलींना त्यांच्या भविष्य देखील सुरक्षित आणि उज्वल करण्याची एक मोठी संधी मिळते आता ही योजना म्हणजे प्रत्येक मुलीला अभिमानाने आणि स्वाभिमानाने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मोठा आर्थिक आधार बनली आहे.

लेक लाडकी योजना (Overview)

योजनेचे नावलेक लाडकी योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासन
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीपिवळे आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुली
मुख्य लाभमुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण १,०१,०००/- रुपये आर्थिक मदत
अर्ज पद्धतएकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा.
अधिकृत वेबसाइटhttps://lly.mhicds.com/

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना योजना काय आहे?

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गरजू गरीब कुटुंबातील मुलींसाठी सुरू केलेली एक आर्थिक मदतीची योजना म्हणून ओळखली जाते आता ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तसेच ज्यांच्या घरी 01 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झाला असेल अशा कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो.

तसेच या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलीच्या जन्माचे स्वागत करणे तसेच मुलीचे शिक्षण थांबू नये त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे म्हणजेच तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकारने मुलींच्या जन्मापासून ते मुलींच्या शिक्षणापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर मुलींच्या पाल्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून मुलींच्या गरजू गरीब पालकांना तिच्या भविष्याची चिंता जराही राहणार नाही आणि मुलगी देखील आर्थिक अडचणी शिवाय त्याचे शिक्षण पूर्ण करू शकेल.

लेक लाडकी योजनेची उद्दिष्ट्ये

  • मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रोत्साहित करणे यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • या योजनेचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा लाभ मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला दिला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे मुलीचे योग्य व याआधी लग्न लावण्याचा प्रवृत्तीला मोठा आळा बसतो.
  • मुलीचे आरोग्य व पालनपोषण सुधारणे जसे की या योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे पालकांना त्यांच्या मुलीच्या आरोग्याची व पोषणाची अधिक चांगली काळजी घेणे शक्य होते.
  • मुलींना आत्मनिर्भर बनवणे या योजनेअंतर्गत मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिला मिळणाऱ्या रकमेमुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा एखाद्या व्यवसायामध्ये कौशल्य मिळवण्याकरिता आर्थिक स्वातंत्र मिळते ज्यामुळे मुलगी आत्मनिर्भर होऊ शकते.
  • समाजामध्ये सकारात्मक बदल करणे, मुलींना ओझे न मानता संपत्ती मारण्याच्या सामाजिक दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडून यावा हे या योजनेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

लेक लाडकी योजना पात्रता निकष

  • अर्जदाराचे कुटुंब हे महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करणाऱ्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे (जर कुटुंबाकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर असे कुटुंब या योजनेसाठी पात्र मानले जात नाहीत).
  • अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एका लाखापेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार कुटुंबातील मुलीचा जन्म 01 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.
  • आणि महत्त्वाचे म्हणजे मुलीचा जन्म हा महाराष्ट्रातील शासकीय किंवा खाजगी रुग्णालयामध्ये झालेला असेल तर तिच्या जन्माची नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजेच ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये केलेली असावी.
  • जर एका कुटुंबामध्ये एकच मुलगी असेल आणि त्यानंतर दुसरे आपत्य नसेल तर त्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा लाभ मिळतो.
  • आणि जर कुटुंबात आधी एक मुलगा असेल त्यानंतर दुसऱ्यांदा मुलीचा जन्म झाल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ दिला जातो.

लेक लाडकी योजनेत मिळणारे आर्थिक लाभ

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीला तिच्या जन्मापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत एकूण पाच टप्प्यांमध्ये लाभ दिला जातो आणि यासाठी राज्य सरकार मार्फत ₹१,०१,००० (एक लाख एक हजार रुपये) एवढी रक्कम मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

टप्पामिळणारी रक्कम
जन्मानंतर₹५,०००
इयत्ता पहिलीत₹६,०००
इयत्ता सहावीत₹७,०००
इयत्ता अकरावीत₹८,०००
१८ वर्षे पूर्ण झाल्यावर₹७५,०००
एकूण लाभ₹१,०१,०००

लेक लाडकी योजनेत मिळणारे आर्थिक लाभ

लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे

मुलीशी संबंधित कागदपत्रे:

  • मुलीचा जन्म दाखला
  • मुलीचे आधार कार्ड: (असल्यास)
  • मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो.

पालकांशी संबंधित कागदपत्रे

  • पालकांचे (आई आणि वडील दोघांचे) आधार कार्ड
  • पालकांचे पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र.
  • पालकांचा (मुलीसोबतचा) फोटो.
  • पालकांचा मोबाईल नंबर.

कौटुंबिक कागदपत्रे

  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • बँक पासबुक: आई किंवा वडिलांच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत (यावर बँक खाते क्रमांक, IFSC कोड स्पष्ट दिसणे आवश्यक आहे).
  • अपत्य संख्येबाबत स्वयं-घोषणापत्र

लेक लाडकी योजना अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया

  • सर्वप्रथम लेक लाडकी योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला या अर्जाच्या PDF ची झेरॉक्स काढायची आहे.
  • तसेच हा अर्ज तुम्हाला तुमच्या गावातील जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे किंवा ग्रामपंचायत कार्यालयात तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयात अगदी मोफत दिला जातो.
  • आता अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अगदी व्यवस्थित रित्या भरा उदाहरणार्थ: तुमच्या मुलीचे नाव, जन्मतारीख, पालकाचे नाव, पत्ता, बँक खाते, आता ही माहिती तुम्हाला अचूक आणि स्पष्ट शब्दांमध्ये भरायची आहे.
  • लक्षात ठेवा अर्जामध्ये कोणतेही खाडाखोड करू नका.
  • अर्जावरती दिलेल्या यादीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडा.
  • आता पूर्ण भरलेला अर्ज आणि सोबत जोडलेली कागदपत्रे हे तुमच्या भागातील अंगणवाडीचे सेविकेकडे जमा करा.
  • आता महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज तपासून तो पुढील कार्यवाहीसाठी मुख्य सेविका किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये सादर करेल.
  • आणि जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर थेट एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये हा अर्ज जमा करा.
  • सरकारी कार्यालयामध्ये अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून अर्ज स्वीकारल्याची पोचपावती नक्की घ्या.
  • या पोच पावती वरती तुमचा अर्ज क्रमांक तसेच अर्जाची तारीख असते यामुळे तुम्हाला भविष्यात तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खूप मदत होते.
  • आता हा अर्ज जमा केल्यानंतर शासकीय अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • आणि सर्व माहिती बरोबर आढळल्यास तसेच कागदपत्रे योग्य आढळल्यास तुमचा अर्ज मंजूर केला जाईल आणि या योजनेच्या नियमानुसार लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
लेक लाडकी योजना अर्ज PDFPDF FORM LINK
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना माहितीहे नक्की वाचा

आणि हो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंगणवाडी सेविका या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे त्यामुळे तुम्हाला जर या योजने संबंधित अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील अंगणवाडी सेविकेकडे संपर्क साधू शकता.

महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन

संपर्क माध्यमतपशील
सर्वात जवळचा संपर्कतुमच्या भागातील अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी केंद्र 
तालुका कार्यालयएकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय (CDPO Office)
जिल्हा कार्यालयजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद
अधिकृत वेबसाइटhttps://lly.mhicds.com/ 

महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

लेक लाडकी योजनेत जुळ्या मुली झाल्यास लाभ मिळेल का?

हो लेक लाडकी योजनेमध्ये जुडवा मुलींना पण लाभ दिला जातो पहिल्या किंवा दुसऱ्या प्रस्तुतीत जुळ्या मुली जन्माला असल्यास त्या दोन्ही मुलींना या योजनेचा स्वतंत्रपणे लाभ मिळते.

लेक लाडकी योजनेत अर्ज करण्यासाठी काही शुल्क (फी) आहे का?

लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शुल्क आकारले जात नाही कारण अर्ज किंवा त्यासाठी लागणारे मदत शासकीय कार्यालयांमध्ये निशुल्क मिळते.

मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५,००० रुपये मिळवण्यासाठी काय अट आहे?

हो मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर ती अविवाहित असणे ही या योजनेची सर्वात महत्त्वाची अट आहे

अर्जाची सद्यस्थिती (Application Status) कशी तपासावी?

तुम्ही जर अंगणवाडी सेविकेकडे किंवा CDPO कार्यालयामध्ये अर्ज सबमिट केला असेल तर परत कार्यालयाला भेट देऊन त्या संबंधित सरकारी अधिकाऱ्याकडे संपर्क साधून अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

Check Also

बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत MSCIT कोर्स करण्याची संधी | Maharashtra Bandhkam Kamgar Yojana-2026

नमस्कार प्रिय मित्रानो, आपले आपल्या मराठी वेबसाईटवर सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या वेबसाईटवर विविध शासकीय …

(SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती जाहिरात क्र. CRPD/ CBO/ 2025-26/14 एकूण जागा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *