
⬛️ कोणाला लाभ घेता येणार?
महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/तरुणींना दिला जाईल.
⬛️ काय आहे योजना?
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या (फक्त मराठा समाजातील) विकासासाठी सण १९९८ मध्ये अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ ची स्थापना करण्यात आली. या मंडळाद्वारे विविध कर्ज व्याज परतावा योजना राबल्या जातात
या महामंडळाकडून जे नविन तरुण व्यवसायिक स्वतःचा व्यवसाय सुरु करणार आहे अशा सर्व तरुणांना पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल जात ज्यामुळे नवीन तरुण उद्योजक आपला व्यवसाय एक उंचीवर नेऊ शकतात.राज्यातील बेरोजगार तरुणांना या योजनेच एक भक्कम अस पाठबळ मिळु शकत. आपल स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकतात अगोदरच व्यवसाय करत असतील तर योजनेतुन अजुन आर्थिक पाठबळ मिळेल.
व्यवसाय करण्यासाठी बिन व्याजी कर्ज देण्याची सोय केलेली आहे जर तुमच्याकडे व्यवसाय करण्याची कल्पना असेल ते पण चांगली व्यवसाया संबधीत सर्व बाबी पटवून देता येत असतील तर महाराष्ट्रा सरकार यासाठी या योजने अंतर्गत १५ लाख रुपयापर्यंतच बिनव्याजी कर्ज मिळू शकत. कर्ज रक्कम ही बीनव्याजी आसल्याने त्यावर कसलाही व्याज भरावा लागत नाही जे काही व्याज असेल ते अण्णासाहेब पाटील महामंडळा मार्फत भरले जाते आणि त्या योजनेच नाव आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना.
⬛️ अण्णासाहेब पाटील महामंडळ उद्दिष्ट्ये ?
- मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास असेलेल्या तरुणांना सक्षम बनवणे.
- तरुणानां योजनेत समाविष्ट करून रोजगार आणि स्वयंरोजगार च्या संधी उपलब्ध करून देणे.
- मराठा मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकांचा विकास घडवून आणणे
कर्ज व्याज परतावा योजना थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही बँक मधून घेतलेल्या कर्जावर वर आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम हि मंडळ द्वारे भरण्यात येते.म्हणजेच आपले कर्ज हे बिनव्याजी स्वरूपाचे होऊन जाते.
⬛️ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ विविध योजना /
महामंडळ द्वारे स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी काही महत्वाच्या योजना पुढील प्रमाणे.
- व्यक्तिगत कर्ज व्याज परतावा योजना
- गट कर्ज व्याज परतावा योजना
- गट प्रकल्प कर्ज योजना
⬛️ अण्णासाहेब पाटील योजनेच्या अटी व शर्ती?
- मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास असणे आवश्यक (उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असावे)
- अर्ज सादर करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील कायमचा रहीवाशी असणे आवश्यक आहे.
- या कर्ज योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष पुर्ण आसावे.या कर्ज योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार पुरुषाचे वय हे जास्तीत-जास्त ५० वर्ष तर अर्जदार महिलांचे वय हे जास्तीत जास्त ५५ वर्ष आसाव.
- अर्ज करणारा उमेदवार हा या अगोदर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोणत्याही इतर योजनेसाठी अर्ज केलेला नसावा किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- जर तुम्ही आगोदर पासुन व्यवसाय करत आहात आणि आता तुम्हा यो महामंडळाकडून कर्ज पाहीजे असेल तर तुमच्याकडे उद्योग आधार व शॉप ॲक्ट परवाना यासारखी व्यवसायाची सर्व आवश्यक कागदपञे आसणे आवश्यक आहे.
- एका कुटुांबातील एकच व्यक्ती एकाच वेळी सदर या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- या शिवाय व्यवसायिक नागरिक जे गटागटाच्या माध्यमातून अर्ज करणार असतील तर अशा उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यायच असेल तर या अगोदर तुमचे कोणत्याही बँकेत कर्ज काढलेले नसाव जर बँकेच कर्ज काढलेल असेल तर ते व्यवस्थित भरलेल म्हणजेच कर्जाची रक्कम परतफेड केलेला आसावी म्हणजेच कर्ज नील आसाव.जर तुमचे कर्ज चालु असेल तर या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही
- लाभार्थ्याने केवळ महाराष्ट्र मध्ये कार्यरत आणि CBS प्रणालीयुक्त बँक कडून कर्ज घेणे अनिवार्य आहे
- एकाच कुटुंबातील रक्त नाते असलेले व्यक्ती जर कर्जाकरिता सहकर्जदार राहले असतील तरी या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात , परंतु अर्जदाराचे नाव प्रथम कर्जत म्हणून असणे आवश्यक आहे
- या योजने अंतर्गत दिव्यगसाठी एकूण ४ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे .
- दिव्यांग म्हणून योजनेचा लाभ घेणारा उमेदवार हा मानसिक दृष्टया सक्षम असावा
- योजनेचा लाभ कर्ज घेतल्यापासून पुढील ५ वर्ष किंवा प्रत्येक्ष कर्ज कालावधी त्यापेक्षा जो कमी असेल तोपर्यंत असले
- कर्ज मर्यादा हि जास्तीत जास्त 15 लाख रुपये आणि व्याजाचा दर हा १२ टक्के द. सा. द. से असेल, आणि त्यानुसार जास्तीत जास्त ३ लाख रुपयापर्यंत व्याज रकमेचा परतावा मंडळ द्वारे केला जाणार आहे.
⬛️ इतर महत्वाची माहिती?
- व्यवसाय सुरु केल्याच्या सहा महिन्यांच्या आत लाभार्थ्याला व्यवसायाचे २ फोटो अपलोड करावयाचे आहेत
- लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल + व्याज) अनुदान स्वरुपात मिळणार आहे . तसेच त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त ३ लाखापर्यंत (१२ टक्क्यांच्या मर्यादेत) कर्ज व्याज परतावा करेल. म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत-जास्त रु. ३ लाखापर्यंत व्याज परतावा अधिक प्रोत्साहनपर पहिला हप्ता देणेत येईल
- Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises (CGTMSE) योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज प्राप्त झाले आहे. अशा लाभार्थ्यांना CGTMSE योजनेअंतर्गत आकारण्यात आलेले Premium शूल्क व्याज परताव्याच्या रकमेसोबत, लाभार्थ्याने दावा केल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होईल
- कर्ज देणाऱ्या बँकेच्या नियमानुसार व्याजाची रक्कम बँकेत भरणा केल्यानंतर, एक-रकमी स्वरुपात महामंडळ हे लाभार्थ्याच्या आधारलिंक कर्ज खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करेल. हा परतावा प्रत्येक महिन्याला वेळेवर हफ्ता परतफेड केल्यास देणेत येईल
- अर्जदाराने या अर्जीत प्रकल्पासाठी इतर कोणत्याही योजनेअंतर्गत, व्याज परतावा/माफी/Interest Subvention योजनेचा लाभ घेतलेला आढळल्यास, एकूण आवश्यक व्याज परतावा वजा इतर योजेनतून घेतलेला व्याजाचा लाभ एवढाच अनुज्ञेय असेल. (उदा. व्याज परतावा आवश्यकता १२% वजा इतर योजनेतून घेतलेला लाभ ५% आहे = ७% एवढा या योजनेतून मिळणारा लाभ असेल.)
- लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केलेनंतर सहा महिन्यामध्ये त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत. तसेच त्यानंतर प्रत्येक चार महिन्यानंतर लाभार्थ्याने त्याच्या व्यवसायाचे अद्ययावत फोटो अपलोड करावयाचे आहेत.
- लाभार्थ्याला महामंडळाच्या योजनेचा लाभ प्राप्त झाल्यानंतर, लाभार्थ्याच्या व्यवसायाच्या फलकावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक सहाय्यातून सदरचा व्यवसाय सुरु केल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख करावा. (उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सौजन्याने)
⬛️ आवश्यक कागदपञे ?
- अर्जदाराचा फोटो
- आधार कार्ड
- राहवासी पुरवा (खालील पैकी कोणतेही एक )
- अद्यावत लाईट बील
- अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक
- अद्यावत टेलीफोन बील/ तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला / रेशन कार्डची प्रत / अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत / भाडे कराराची प्रत ( संबंधित कागतपत्रांवर जर नातेवाईकांचे नाव असेल तर पुरावा जोडताना अर्जदाराच्या नावाचा नसेल तर संबंधिताशी असणारे नाते दर्शविणारा अन्य पुरावा जोडावा
- उत्पनाचा पुरावा (खालील पैकी कोणतेही एक )
– तहसिलदारांनी दिलेले अद्यावत कौटूंबिक उत्पन्नाचा दाखला
– अद्यावत ITR ची प्रत अर्जदारासाठी आणि त्यांच्या/ तिच्या पती/ पत्नीसाठी (असल्यास) पती/ पत्नीची ITR ची प्रत जोडणे आवश्यक असेल - जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला (हिन्दू मराठा)
- शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन (गुमास्ता लायन्सस)
- उद्यम आधार रेजिस्ट्रेशन
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
⬛️ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अर्ज कसा करायचा ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे
सर्व ऑनलाईन अर्ज प्रकिया दाखल झाल्यावर संबधीत आधिकारी आपल्या अर्जाची पडताळणी करतील आणि जर तुमचे सर्व कागदपत्रे योग्य असतील व तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाञ आसाल तर तुम्हाला योजनेचा मिळणार कि नाही याबद्दल कळवल जाईल जर तुम्ही योजनेसाठी पाञ आसाल तर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल
या योजनेतुन बिन व्याज पंधरा लाख मिळतात पण तुम्हाला पंधरा लाख मिळतीलच अस नाही तर तुमच्या व्यवसायाच्या निवडीनुसार व तुमच्या मागील बँक खात्याच्या तपशील नुसार कर्ज दिल जात हे कर्ज दोन लाख ते पंधरा लाखापर्यंत आहे.हे कर्ज तुम्ही नविन व्यवसाय करण्यासाठी किंवा आपला आगोदरचा जुना व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा वापर करु शकता.जर तुमची व्यवसाय कल्पनेत संभाव्यता असेल ती कल्पना तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पटवून देता येत असेल बँकेच्या आधिकार्याला पटवून देत येत आसेल तर व्यवसायासाठी कर्ज मिळवण्याच्या प्रकियेला लागा.आणि आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभा करा
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs