TAIT 2025 अर्ज करण्यास नवीन मुदत वाढ जाहीर, शेवटच्या वर्षीचे विद्यार्थी पात्र! Maha TAIT Exam 2025


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणाली वापरून शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TET) २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत आधी १० मे होती, परंतु आता ती वाढवून १४ मे २०२५ करण्यात आली आहे. बी.एड. किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रवेश घेतलेले किंवा अंतिम परीक्षेला बसलेले विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी पात्र आहेत. मात्र, ५ मे २०२५ पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना सुधारित तरतुदींचा लाभ घ्यायचा असल्यास पुन्हा एकदा नवीन अर्ज करावा लागणार आहे. जुने अर्ज रद्द करण्यात येणार आहेत.

TET परीक्षा कालावधी:
२४ मे ते ५ जून २०२५ दरम्यान TET परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

इतर स्पर्धा परीक्षांसोबत परीक्षा तडजोड:
जर TET परीक्षेच्या तारखा बी.एड., एम.एड., एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या तारखांशी जुळत असतील, तर उमेदवारांनी १४ मे पर्यंत परीक्षा परिषदेने दिलेल्या विशेष लिंकवर आपली माहिती भरून द्यावी. यानंतर त्या उमेदवारांसाठी वेगळ्या बॅचचे नियोजन करण्यात येईल.

महत्त्वाची सूचना:
तयारी असून देखील अर्जाची माहिती वेळेत न दिल्यास परीक्षा गमवावी लागू शकते. याची जबाबदारी पूर्णपणे उमेदवारांची असेल, असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

नवीन प्रसिद्ध परिपत्रकानुसार व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवारही शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) -२०२५ चे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील, तरी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/ या लिंकद्वारे विहित मुदतीत करावी.

✅TAIT अर्ज भरतांना हि माहिती काळजीपूर्वक भरा – TAIT परीक्षेबद्दल पूर्ण माहिती !!

  • – राज्य परीक्षा परिषदेमार्फत घोषित केलेल्या या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असून, अर्ज करताना तीन जिल्हा परीक्षा केंद्रांची निवड करावी लागणार
  • – अराखीव गटासाठी ९५० रुपये आणि राखीव गटासाठी ८५० रुपये शुल्क असून, परीक्षेसाठी प्रवेशपत्र लवकरच होणार उपलब्ध होणार
  • – मराठी, इंग्रजी, उर्दू या माध्यमात परीक्षा देता येणार असून, मराठी आणि इंग्रजीचे भाषिक क्षमतेवरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक राहणार
  • – राज्य परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली असून, १० मे २०२५ पर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली.

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *