
Sukanya Samriddhi Yojana: प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांचा एकच स्वप्न असतं आपली आपल्या मुलीने सर्वोत्तम आयुष्य जगावे तिने खूप शिकावं आणि तिच्या पायावर खंबीरपणे उभी राहावी तिचे प्रत्येक स्वप्न अगदी सहजपणे पूर्ण व्हावे आणि यासाठी मुलीचे आई-वडील अहोरात्र कष्ट घेत असतात पण आता वाढत्या महागाईच्या काळात मुलीच्या शिक्षणाचा खर्च तसेच तिच्या लग्नाचा खर्च कसा भागवायचा हे चिंता प्रत्येक आई वडिलाला सतावत असते.
पण काळजी करू नका तुमच्या मुलीच्या भविष्याची चिंता दूर करण्याकरिता तसेच तिच्या स्वप्नांना पंख देण्याकरिता भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही केवळ एक योजनाच नाही तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला दिलेली एक अमूल्य भेट आहे ही योजना म्हणजे एक असं वचन आहे जे मुलीच्या भविष्याला आर्थिक दृष्ट्या सुरक्षित तसेच मजबूत बनवते तर मग चला सुकन्या समृद्धी योजनेबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि मुलींच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलू या.
सुकन्या समृद्धी योजना (overview)
| वैशिष्ट्य | तपशील |
| योजनेचे नाव | सुकन्या समृद्धी योजना (SSY) |
| कोणासाठी? | 10 वर्षांखालील मुलींसाठी |
| व्याजदर | 8.2% (सध्या) |
| गुंतवणूक | किमान ₹250, कमाल ₹1.5 लाख (वार्षिक) |
| फायदा | शिक्षण/लग्नासाठी सुरक्षित, कर-बचत गुंतवणूक. |
| सरकारचा अधिकृत जीआर | GR PDF LINK |
सुकन्या समृद्धी योजना (overview)
सुकन्या समृद्धी योजना काय आहे
समजा सुकन्या समृद्धी योजना म्हणजे एक पिगीबँक आहे पण ही पिगी बँक साधीसुधी नसून ती केंद्र सरकारमार्फत चालवण्यात येते आणि याच सरकारी पिगी बँक च नाव सुकन्या समृद्धी योजना आहे.
म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्ही दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्याही बँकेचे खाते उघडू शकता त्यानंतर तुम्हाला जमेल तसे थोडे थोडे पैसे दरवर्षी म्हणजेच अगदी 250 रुपयांपासून या खात्यात जमा करू शकता आणि तुम्ही जे पैसे जमा करता त्यावर सरकार इतर अनेक योजनांपेक्षा जास्त व्याजदर देते आणि याच चक्रवाढ व्याजामुळे तुमची रक्कम अगदी वेगाने वाढायला सुरुवात होते.
तुमची मुलगी जेव्हा मोठी होईल तेव्हा तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नाच्या पैशांसाठी तुम्हाला कोणतीही चिंता सतावणार नाही कारण मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिच्या शिक्षणासाठी यातूनच तुम्हाला काही रक्कम काढता येते तसेच मुलगी 21 वर्षाची झाल्यावर तुम्हाला इच्छा असल्यास बँक खात्यामधून पूर्ण रक्कम काढता येते हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
म्हणजेच आता थोडक्यात सांगायचं झालं तर सुकन्या समृद्धी योजना म्हणजे तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी आज केलेली एक छोटीशी पण खूप फायदेशीर बचत आहे जे तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक भरभक्कम आधार बनते.
सुकन्या समृद्धी योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये
- अनेकदा गरजू गरीब मुली पैशांच्या अभावी शिक्षण घेत नाही आणि हीच आर्थिक अडचण दूर व्हावी आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक मुलीला तिच्या आवडीचे शिक्षण घेता यावे याकरिता एक मोठा निधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्टे आहे.
- अनेक पालकांच्या मनात मुलीच्या लग्नाबाबतचा खर्च आठवला की चिंता निर्माण होते या योजनेद्वारे पालक सुरुवातीपासूनच थोडी थोडी बचत करून एक मोठी रक्कम जमा करू शकतात जेणेकरून मुलीच्या लग्नाच्या वेळेस त्यांच्यावर कोणताही आर्थिक ताण येणार नाही तसेच त्यांना कर्ज काढण्याची पण गरज पडणार नाही.
- सुकन्या समृद्धी योजना हे केवळ शिक्षण आणि लग्नपूर्तीच मर्यादित नाही तर मुलगी 21 वर्षाची झाल्यावर तिच्या नावावर एक मोठी रक्कम जमा होते ज्यामुळे तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळते आणि या पैशांचा वापर ती तिचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच इतर महत्त्वाच्या कामांसाठी देखील करू शकते.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष
मुलीचे वय
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी तुमच्या मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- मुलीच्या जन्मानंतर लगेचच तिच्या नावाचे बँक खाते उघडता येते.
- जर मुलीने तिचे 10 वर्षे पूर्ण केलेले असतील आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत खाते उघडायचे असेल तर उघडता येणार नाही.
खाते कोण उघडू शकते?
- मुलीचे पालक मुलीच्या नावावरती हे खाते उघडू शकतात.
- जर मुलीचे पालक हयात नसतील तर तिचे कायदेशीर पालक आवश्यक कागदपत्रे सादर करून खाते उघडू शकतात.
- या योजनेअंतर्गत मुलीच्या नावानेच खाते उघडले जाते फक्त पालक ते चालवणारे असतात आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला खाते चालवण्याचा हक्क मिळतो.
नागरिकत्व
- बँक खाते उघडताना मुलगी हे भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.
- खाते उघडल्यानंतर जर मुलगी दुसऱ्या देशांमध्ये स्थायिक झाली म्हणजेच दुसऱ्या देशाची नागरिक झाली तर हे खाते बंद केले जाते.
एका कुटुंबासाठी खात्यांची संख्या
- एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोन मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडता येतात.
- आणि महत्त्वाचं म्हणजे एका मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडले जाऊ शकते.
एकदा नक्की वाचा: तुमच्या लाडक्या मुलींसाठी सरकारने सुरू केली लेक लाडकी योजना सविस्तर माहिती जाणून घ्या
सुकन्या समृद्धी योजनेचे आर्थिक फायदे
सुकन्या समृद्धी योजना हे केवळ मुलीच्या भविष्यासाठी करण्यात आलेली बचत योजना नाही तर ती आर्थिक फायद्याचा एक उत्तम खजिना देखील आहे या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला अनेक फायदे मिळतात तर चला या योजनेचे काही मुख्य आर्थिक फायदे आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
आकर्षक आणि उच्च व्याजदर
सुकन्या समृद्धी योजनेचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फायदा म्हणजे यावरती मिळणारा उच्च व्याजदर तर बघा सरकार दर तीन महिन्यांनी या योजनेवरती व्याजदर निश्चित करत असते जो सहसा PPF, FD किंवा इतर छोट्या बचत योजनांपेक्षा जास्त असतो.
- मी तुम्हाला सध्याचा व्याजदर सांगतो तर बघा ऑक्टोंबर 2025 ते डिसेंबर 2025 या तिन्ही महिन्यासाठी सरकारने 8.2% व्याजदर निश्चित केला आहे जो बाजारातील सुरक्षित आणि गुंतवणूक पर्यायाच्या तुलनेने खूप चांगला आहे
चक्रवाढ व्याजाचा जबरदस्त फायदा (Power of Compounding)
सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा मिळतो याचा अर्थ म्हणजे तुम्ही जमा केलेल्या रकमेवरती तर तुम्हाला व्यास मिळतेच पण त्या व्याजावरचही व्याज तुम्हाला मिळत राहते यामुळे तुमची रक्कम अगदी वेगाने वाढते म्हणून सुरुवातीला केलेली छोटी बचत सुद्धा तुम्हाला दीर्घकाळात एक मोठा आधार ठरू शकते.
‘EEE’ दर्जाची तिहेरी कर सवलत (Triple Tax Benefit)
मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना करबचतीसाठी सर्वोत्तम मानले जाते कारण तिला Exempt-Exempt-Exempt हा दर्जा प्राप्त आहे याचा अर्थ तुम्हाला तीन स्तरावर कर सवलत मिळते:
- पहिला स्तर गुंतवणुकीवर सवलत म्हणजे तुम्ही एका आर्थिक वर्षात या योजनेत जेवढी रक्कम बोलता जास्तीत जास्त 1.5 लाख तर त्यावर तुम्हाला आयकर कायद्याची कलम Section 80C अंतर्गत सवलत मिळते यामुळे तुमचा कर देखील कमी होतो.
- दुसरा स्तर मिळणाऱ्या व्याजावर सवलत म्हणजेच दरवर्षी तुमच्या बँक खात्यात जमा होणाऱ्या व्याजाच्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही म्हणजेच हे व्याज पूर्ण करमुक्त असतं.
- तिसरा स्तर रकमेवर सवलत मुलगी 21 वर्षाची झाल्यावर किंवा खाते बंद करताना मिळणारी संपूर्ण रक्कम म्हणजेच व्याज आणि मुद्दल पूर्णपणे करमुक्त असते यावर कोणताही टॅक्स किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकही रुपये भरावा लागत नाही.
मॅच्युरिटीवर मोठी रक्कम (Guaranteed High Returns)
सुकन्या समृद्धी योजनेत पंधरा वर्षे गुंतवणूक केल्यानंतर 21 व्या वर्षी बँक खाते mature होते तोपर्यंत रकमेवर मिळणाऱ्या चक्रावर व्याजामुळे एक मोठी रक्कम तयार होते जी तुम्ही तुमच्या मुलीच्या उच्च शिक्षणात करिता किंवा तिच्या लग्नासाठी अगदी सहज पद्धतीने वापरू शकता.
एकदा नक्की वाचा: Good News! लाडकी बहीण योजनेची E-KYC सुरू, Direct Link वरून अर्ज भरा!
चला एका उदाहरणाने समजून घेऊया
तर चला तुम्हाला मी एका उदाहरणाद्वारे समजून सांगतो म्हणजेच तुम्ही किती रुपये गुंतवले तर तुम्हाला किती व्याज मिळेल त्याच्यावरती किती चक्रवाढ व्याज सुरू होईल आणि हे पैसे तुम्ही कधी काढू शकता आता सोप्या भाषेत समजून घेऊया.
जर समजा तुम्ही तुमच्या एका वर्षाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले म्हणजेच वर्षाला 1,20,000 हजार रुपये अशी गुंतवणूक करायला सुरुवात केली.
- तुमची एकूण गुंतवणूक: तुम्ही १५ वर्षांसाठी दरवर्षी ₹१,२०,००० गुंतवाल.
- ₹१,२०,००० × १५ वर्षे = ₹१८,००,०००
- मॅच्युरिटीची वेळ: हे खाते २१ वर्षांनंतर मॅच्युअर होईल.
आणि जर 15 वर्षानंतर जर तुम्ही गुंतवणूक थांबवली तर तुमच्या जमा रकमेवर तुम्हाला 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत सध्याच्या ८.२% व्याजदराने व्याज मिळत राहील. म्हणजेच 21 वर्षानंतर तुमच्या मुलीच्या बँक खात्यामध्ये अंदाजे 58 लाख पेक्षा जास्त रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच पालकांनो आता विचार करा तुमची एकूण गुंतवणूक फक्त 18 लाख आहे पण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजामुळे त्यावर तुम्हाला अंदाजे चाळीस लाखापेक्षा जास्त व्याज मिळाले आणि ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असेल आणि तुमच्या मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक भर भक्कम आर्थिक आधार मिळेल.
सुकन्या समृद्धी योजनेचे (SSY) खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचा फॉर्म (SSY Account Opening Form)
- हा अर्ज तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत मिळेल.
- सुकन्या समृद्धी योजने संबंधित अर्ज तुम्हाला बँकेच्या किंवा पोस्टाच्या अधिकृत वेबसाईट वरती बघायला मिळेल.
| सुकन्या समृद्धी योजना अर्ज (PDF) | Application PDF LINK |
मुलीचा जन्म दाखला
जन्माचा दाखला हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे ज्यामुळे मुलीच्या वयाची खात्री केली जाते तर हा जन्माचा दाखला तुम्हाला महानगरपालिका ग्रामपंचायती किंवा नगरपालिकेकडून मिळतो
पालकांचे किंवा कायदेशीर पालकांचे ओळखपत्र (कोणतेही एक)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- मतदान ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
पालकांचे किंवा कायदेशीर पालकांचे पत्त्याचा पुरावा (कोणतेही एक)
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- वीज बिल
- टेलिफोन बिल
- पाणीपट्टी
- रेशन कार्ड
पालक आणि मुलीचे छायाचित्र (Photographs)
- पालकाचे आणि अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईट्स आकाराचे फोटो असावे कारण काही बँकांमध्ये मुलीचा फोटो देखील मागितला जाऊ शकतो.
सुरुवातीची जमा रक्कम
- तुमच्या मुलीचे बँक खाते उघडताना किमान तुम्हाला त्यामध्ये 250 रुपये एवढी रक्कम जमा करणे आवश्यक आहे तुम्ही ही रक्कम चेक द्वारे किंवा कॅशद्वारे किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे भरू शकता
सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया (Step-by-Step Guide)
सुकन्या समृद्धी योजने करिता बँक खाते उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ आहे तुम्ही तुमच्या गावातील जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा सरकारने अधिकृत केलेल्या बँक शाखेत जाऊन हे खाते अगदी सहज पद्धतीने उघडू शकता आता खाते कसे उघडायचे यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील याची सविस्तर माहिती मी खाली दिली आहे:
- सर्वात आधी तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये खाते उघडायचे आहे ते ठरवा आणि तुम्ही खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी जाऊ शकता.
- पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, HDFC बँक यांसारख्या अनेक राष्ट्रीय आणि खाजगी बँकांना हे खाते उघडण्याची परवानगी आहे.
- तुम्ही निवडलेल्या बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज मागा हा अर्ज बँकेकडून अगदी मोफत मिळतो.
- अर्जामध्ये विचारली जाणारी माहिती अगदी सविस्तरपणे आणि अचूक भरा: जसे की ज्या मुलीचे खाते उघडायचे आहे तिचे पूर्ण नाव, अर्ज करणाऱ्या आई-वडिलांचे नाव, जन्म दाखल्यानुसार अचूक जन्मतारीख, तुमचा सध्याचा आणि कायमचा पत्ता, तुम्ही खाते उघडताना किती रक्कम जमा करणार आहात (किमान ₹२५०), आवश्यक ठिकाणी पालक आणि मुलीच्या सहीसाठी (किंवा अंगठ्याचा ठसा) जागा असेल, तिथे सही करा.
फॉर्म व्यवस्थित रित्या भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली दिलेली कागदपत्रे जोडावी लागतील या कागदपत्रांच्या तुम्हाला अगदी क्लिअर झेरॉक्स काढून ठेवायच्या आहेत.
- सुकन्या समृद्धी योजनेचा भरलेला अर्ज.
- मुलीचा जन्म दाखला.
- पालकांचे ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड).
- पालकांच्या पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड/वीज बिल).
- पालकांचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
NOTE: व्हेरिफिकेशन पूर्वी सर्व मूळ कागदपत्रे म्हणजेच ओरिजनल डॉक्युमेंट्स सोबत ठेवा कारण अर्ज भरल्यावर बँकेचे अधिकारी सर्व ओरिजनल कागदपत्रे तपासून ते तुम्हाला परत करतील.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर जोडलेली कागदपत्रे बँकेकडे किंवा पोस्ट ऑफिस मधील संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करा
- हे अधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची व्यवस्थितरित्या परताळणी करतील
- आता ही कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावर बँकेचे अधिकारी तुम्हाला खात्यामध्ये पहिली रक्कम जमा करायला सांगतील.
- ही रक्कम तुम्ही कमीत कमी 250 रुपये किंवा जास्तीत जास्त 1,50,000 पर्यंत जमा करू शकता.
- रक्कम जमा केल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल ती सांभाळून ठेवा.
- खात्यामध्ये रक्कम जमा होतात ते खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि बँकेमार्फत किंवा पोस्ट ऑफिस मार्फत तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक देण्यात येईल.
- या पासबुक मध्ये तुमच्या मुलीचे नाव खाते क्रमांक तसेच जमा केलेल्या रक्कमेची नोंद असेल.
- भविष्यामध्ये खात्यात पैसे जमा करण्यासाठी किंवा खात्याची माहिती पाहण्यासाठी हे पासबुक खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे या पासबुकला सांभाळून ठेवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
एखाद्या वर्षी खात्यात पैसे भरायचे राहून गेले तर काय होते? खाते बंद होते का?
असं काहीही होणार नाही तुम्ही काळजी करू नका तुमची खाते बंद होणार नाही फक्त ते निष्क्रिय केले जाईल तुम्ही जमा केलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि त्यावरती व्याज देखील मिळत राहील ते खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला चुकलेल्या प्रत्येक वर्षासाठी फक्त पन्नास रुपये दंड आकारला जाईल आणि किमान वार्षिक 250 रुपये रक्कम भरावी लागेल त्यानंतर तुमचे बँक खाते पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू होईल.
गरजेच्या वेळी, २१ वर्षे पूर्ण होण्याआधी पैसे काढता येतात का?
हो फक्त एका विशिष्ट आणि महत्त्वाच्या कारणासाठी तुम्ही हे पैसे काढू शकता म्हणजे बघा तुमच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी जेव्हा मुलगी 18 वर्षाची पूर्ण होते किंवा ते दहावी उत्तीर्ण करते तेव्हा तिच्या कॉलेजच्या किंवा कोर्सच्या फी साठी तुम्ही खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढू शकता पण महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही सामान्य कारणासाठी मदतीपूर्वी हे पैसे काढता येत नाही कारण या योजनेचा मुख्य उद्देश हा मुलीचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे.
मला या योजनेत पूर्ण २१ वर्षे पैसे भरावे लागतात का?
नाही आणि सुकन्या समृद्धी योजनेची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला फक्त खाते उघडल्यापासून पहिली पंधरा वर्षे पैसे भरायची आहे त्यानंतर पुढची सहा वर्ष म्हणजेच खात्याला 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत तुम्हाला एकही रुपये भरावा लागणार नाही तुम्ही पैसे भरणे थांबवले असले तरी तुमच्या जमा रकमेवर चक्र व्याज वाढतच राहील आणि यामधून एक मोठी रक्कम निर्माण होत जाईल.
मुलीचे लग्न जर २१ वर्षांच्या आधी झाले, तर खात्याचे काय होते?
जर तुमची मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिचे लग्न झाले तर तुम्ही हे खाते वेळेपूर्वीच बंद करू शकता लग्नाची आवश्यक कागदपत्रे दाखवून तुम्ही खात्यात जमा असलेली रक्कम मुद्दल आणि व्याजासोबत काढू शकता यामुळे मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी एक मोठी आर्थिक मदत मिळेल.
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs