
⬛️ शासन निर्णय
1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे स्वयंपूर्ण करण्यासाठी वीज बिलात बचत व अतिरिक्त उत्पन्न मिळावे म्हणून “SMART सोलार योजना” मंजूर करण्यात आली आहे .
2. सुमारे 5 लाख घरगुती ग्राहक (1,54,622 दारिद्र्यरेषेखालील & 3,45,378 आर्थिकदृष्ट्या दुर्बल ) यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
3. 2025-26 साठी ₹330 कोटी आणि 2026-27 साठी ₹325 कोटी इतकी रक्कम मंजूर.
⬛️ योजनेची उद्दिष्टे
• दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे स्वयंपूर्ण करणे.
• अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे.
• राज्यातील छतावरील सौर निर्मिती क्षमतेत वाढ.
• स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देणे.
| अ.क्र. | ग्राहक प्रकार | राज्य सरकारचा हिस्सा | |
| 1 | दारिद्र्यरेषेखालील ग्राहक | 35% | |
| 2 | 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेले ग्राहक आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहक | सर्वसाधारण गट | 20% |
| 3 | अनुसूचित जाती | 30% | |
| 4 | अनुसूचित जमाती | 30% | |
| ग्राहक प्रकार | ग्राहकाचा हिस्सा | राज्य सरकार | केंद्र सरकार |
| दारिद्र्यरेषेखालील | 2500 रु. | 17500 रु. | 30000 रु. |
| आर्थिक दुर्बल (सामान्य) | 10000 रु. | 10000 रु. | 30000 रु |
| आर्थिक दुर्बल (SC/ST) | 5000 रु. | 15000 रु. | 30000 रु |
⬛️ निधी व लेखाशिर्षक
एकूण ₹655 कोटी खर्च अपेक्षित आहे.
महावितरण कंपनीमार्फत सहाय्यक अनुदान वितरणासाठी स्वतंत्र लेखाशिर्षक उघडण्यात येईल.
⬛️ अंमलबजावणी संस्था
या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) द्वारे करण्यात येईल.
⬛️ लाभार्थी पात्रता
- ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापनेसाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
- इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल.
- वीज ग्राहक थकबाकीमुक्त असणे आवश्यक असेल.
- ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष 2025 (ऑक्टोबर-2024 ते सप्टेंबर-2025) मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसलेला असेल, असे ग्राहक योजनेत भाग घेण्यास पात्र असतील.
- फक्त सिंगल फेज वीज ग्राहक योजनेत भाग घेण्यास पात्र असतील.
- दारिद्र्यरेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्यरेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर राबवावी.
⬛️ योजनेचा कालावधी
ही योजना मार्च 2027 पर्यंत लागू राहील.
⬛️ अंमलबजावणी प्रक्रिया
• लाभासाठी ऑनलाईन नोंदणी
• पात्र ग्राहकांची तांत्रिक तपासणी.
• निविदेद्वारे पुरवठादारांची निवड.
• बसवलेल्या प्रणालींची तपासणी व गुणवत्ता नियंत्रण.
• पुरवठादारांकडून 5 वर्षांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी घेतली जाईल.
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs