सांगली मिरज आणि कुपवाड एप्रिल अखेर 200 पदांवर नोकर भरती अर्ज प्रक्रिया सुरु!! | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025

महापालिकेत सध्या कर्मचारी पदोन्नती प्रक्रिया सुरू आहे. एकूण 300 कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळेल. त्यापैकी 50 कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळाली आहे. 12 एप्रिलपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर एप्रिलअखेर सुमारे 200 पदांवर नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. महापालिकेच्या मंजूर आकृतिबंधानुसार कर्मचार्‍यांची पदसंख्या 3 हजार 445 झाली आहे. मात्र प्रत्यक्षात सध्या पालिकेत 1390 कायम कर्मचारी कार्यरत आहेत, तर मानधन, बदली व रोजंदारीवर 1250 कर्मचारी आहेत. महापालिकेत मोठ्या प्रमाणात कायम कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पदोन्नतीनंतर नोकरभरती प्रक्रिया सुरू होईल. महापालिकेत काही तांत्रिक पदांची भरती करण्यास शासनानेही मान्यता दिली आहे.

पण त्यापूर्वी कार्यरत कर्मचार्‍यांतील पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नती देत रिक्त पदे भरण्यात येत आहेत. पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात आली. महापालिका कर्मचार्‍यांच्या नवीन आकृतिबंधात वर्ग 1 ते 4 मधील 481 पदे पदोन्नतीने भरायची आहेत. कर्मचार्‍यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, सेवाज्येष्ठता हे निकष तपासून पदोन्नती समितीत पदोन्नतीसाठी पात्र, अपात्र कर्मचार्‍यांची निवड होते. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीत अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख यांचा समावेश आहे. आतापर्यंत शाखा अभियंता व कनिष्ठ लिपिक संवर्गातील 50 कर्मचार्‍यांची पदोन्नती समितीत मंजूर करण्यात आली आहे. अन्य कर्मचार्‍यांची प्रक्रिया सुरू आहे. 12 एप्रिलपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होईल. सुमारे 300 कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळेल. पदोन्नतीनंतर एप्रिलअखेरीस नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होईल. शासनाने महापालिकेला 568 पदांवर भरतीची परवानगी दिलेली आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत “पशु वैद्यकीय अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 ०५ मार्च २०२५ आहे

  • पदाचे नाव – पशु वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या –  01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –सांगली
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  अर्ज मा. सहा. आयुक्त. सा. प्र. वि. कर्मचारी भरती/पदोन्नती कक्ष सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांचे नावे फक्त आपटा पोलिस चौकी जवळ, चौकोनी पाण्याची टाकी, पहिला मजला सांगली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ मार्च २०२५
  • अधिकृत वेबसाईट – smkc.gov.in

How To Apply For SMKM Job 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०५ मार्च २०२५ आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For smkc.gov.in Arj 2025
📑 PDF जाहिरात (New)https://shorturl.at/nh8Te

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  अर्ज मा. सहा. आयुक्त. सा. प्र. वि. कर्मचारी भरती/पदोन्नती कक्ष सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांचे नावे फक्त आपटा पोलिस चौकी जवळ, चौकोनी पाण्याची टाकी, पहिला मजला सांगली

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *