1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार 8000 रुपये, पालकांनो आजच अर्ज करा

जर तुमच्या घरात देखील इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणारे मुले असतील आणि तुम्ही एससी प्रवर्गातील असाल किंवा तुमचे काम अस्वच्छ आणि धोकादायक व्यवसायाचे असेल म्हणजेच जसे की तुम्ही जर सफाई कामगार असाल कातडी कमावणारे तसेच कचरा वेचणारे किंवा इत्यादी कोणतीही कामे करत असाल तर सरकारकडून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलांना दरवर्षी 3500 ते 8000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप देण्यात येते जेणेकरून गरजू गरीब विद्यार्थी त्यांचे शिक्षण कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय पूर्ण करू शकतील.

आता जे विद्यार्थी एसी प्रवर्गातील आहेत तसेच ते इयत्ता नववी आणि दहावी मध्ये शिकत आहेत असेच विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात परंतु जे लोक अस्वच्छ आणि धोकादायक व्यवसायामध्ये काम करतात अशा लोकांच्या मुलांसाठी ही स्कॉलरशिप योजना इयत्ता पहिली पासूनच लागू होते आता या प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजने करिता तुम्ही नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वरती अगदी सहज पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तसेच अर्ज करताना कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे अर्ज पूर्ण झाल्यावर ती शिष्यवृत्तीची रक्कम तुम्हाला किती मिळणार आहे या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Pre-Matric Scholarships Scheme 2025: Overview

तपशीलमाहिती
शिष्यवृत्तीचे नावPre-Matric Scholarship Scheme for SC Students & Others 2025-26
मंत्रालयसामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार
कोण अर्ज करू शकतो?इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये शिक्षण घेणारे SC विद्यार्थी
इयत्ता 1 ते 10 मध्ये शिक्षण घेणारे अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांची मुले
शिष्यवृत्ती रक्कम₹3,500 ते ₹8,000 प्रतिवर्ष दिव्यांग विद्यार्थ्यांना 10% अतिरिक्त
अर्ज पद्धतऑनलाइन (National Scholarship Portal – NSP)
अधिकृत वेबसाइटscholarships.gov.in
योजनेची लिंकhttps://socialjustice.gov.in/schemes/23
हेल्पलाईनNSP हेल्पडेस्क: 0120-6619540

Pre-Matric Scholarships Scheme 2025-26: Details

तुम्ही देखील अनुसूचित जाती प्रवर्गातील असाल किंवा अस्वच्छ ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी दिवसभर व्यवसाय करत असाल आणि आर्थिक अडचणीमुळे तुमच्या मुलांचे शिक्षण नीट होत नसेल तर आता सरकारने तुमच्या मुलांसाठी एक खास शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीमधील जे विद्यार्थी नववी दहावी मध्ये शिकत आहेत आणि अस्वच्छ धोकादायक व्यवसाय करणाऱ्यांची मुले जी इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकत आहेत त्यांना हे शिष्यवृत्ती देण्यात येते.

आता जी मुले घरातून शाळेत येजा करतात त्यांना 3500 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते तसेच जी मुले वस्तीगृहामध्ये राहतात त्यापैकी एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सात हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते सोबतच अस्वच्छ धोकादायक व्यवसाय करणाऱ्यांच्या मुलांना आठ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते आणि जर विद्यार्थी दिव्यांग अपंग असेल तर अशा विद्यार्थ्यांना 10% अतिरिक्त रक्कम देण्यात येते.

Important Dates of Pre-Matric Scholarship 2025-26

ActivityDate
Application StartFrom April 2025 (every year)
Last Date to ApplyVaries by State (usually October–November)
Scholarship DisbursementFull annual amount in one installment

Pre-Matric Scholarship Amount 2025-26

विद्यार्थी प्रकारडे स्कॉलर (घरी राहणारे)हॉस्टेलर (वसतिगृहात राहणारे)
घटक 1 – SC विद्यार्थी (इयत्ता 9 वी ते 10 वी)₹3,500 प्रतिवर्ष₹7,000 प्रतिवर्ष
घटक 2 – अस्वच्छ व धोकादायक व्यवसाय करणाऱ्या पालकांची मुले (इयत्ता 3 री ते 10 वी)₹3,500 प्रतिवर्ष₹8,000 प्रतिवर्ष
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त रक्कमप्रत्येक श्रेणीत 10% अतिरिक्तप्रत्येक श्रेणीत 10% अतिरिक्त

Pre-Matric Scholarship Eligibility Criteria 2025

योजनेचा घटककोण अर्ज करू शकतो?उत्पन्न मर्यादा
SC विद्यार्थीअनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थी
इयत्ता 9 वी किंवा 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेला
शासकीय किंवा शासनमान्य शाळेत शिकणारा
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा कमी असावे
अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील मुलेपालकांचा व्यवसाय – सफाई कर्मचारी, चामड्याचे काम, कचरा वेचणे, धोकादायक स्वच्छता काम
इयत्ता 1 ते 10 मधील कोणताही विद्यार्थी
कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही

Pre-Matric Scholarship Documents List

  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक (शक्यतो आधार लिंक केलेले असावे)
  • SC जातीचा दाखला (घटक १ साठी)
  • व्यवसायाचे प्रमाणपत्र/दाखला (घटक २ साठी)
  • मागील वर्षाची गुणपत्रिका (Mark sheet)
  • उत्पन्नाचा दाखला (फक्त घटक १ मधील SC विद्यार्थ्यांसाठी)
  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (Bonafide Certificate)
  • मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो

How to Apply Online for Pre-Matric Scholarship 2025?

  • अधिकृत वेबसाइटवर जा सर्वात आधी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या (National Scholarship Portal – NSP) अधिकृत वेबसाइटवर [https://scholarships.gov.in/Students] भेट द्या.
  • जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल, तर होमपेजवर ‘Student Registration’ किंवा ‘One Time Registration (OTR)’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आधार कार्ड आणि मोबाईल नंबर वापरून आपली नोंदणी पूर्ण करा. तुम्हाला एक युनिक ‘Reference Number’ किंवा ‘OTR ID’ मिळेल.
  • मिळालेला OTR नंबर आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर Login करा.
  • लॉगिन झाल्यानंतर ‘Application Form’ या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती (नाव, जन्मतारीख, पत्ता), शैक्षणिक माहिती (शाळा, इयत्ता) आणि बँक तपशील काळजीपूर्वक भरा.
  • तुमची सर्व माहिती भरल्यानंतर, सिस्टम तुम्हाला ज्या योजनांसाठी तुम्ही पात्र आहात त्या योजना दाखवेल.
  • त्यातून “Pre-Matric Scholarship for SC Students” किंवा संबंधित योजना निवडा.
  • वर सांगितलेली आवश्यक कागदपत्रे (उदा. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, फोटो इ.) स्कॅन करून अपलोड करा. (लक्षात ठेवा: फाइलची साईज मर्यादेत असावी).
  • भरलेली सर्व माहिती एकदा तपासा. काही चूक असल्यास ती दुरुस्त करा.
  • सर्व काही बरोबर असल्यास ‘Final Submit’ बटनावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट आऊट काढून घ्या. ही प्रिंट आणि कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती भविष्यातील संदर्भासाठी किंवा शाळेत जमा करण्यासाठी स्वतःजवळ ठेवा.

Conclusion

मित्रांनो या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला प्री पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती 2025 26 या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली ही योजना अनुसूचित जातीच्या एससी विद्यार्थ्यांकरीता आणि अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलांकरिता सुरू करण्यात आली आहे जर तुमच्या घरात इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणारे मुलं असतील आणि तुम्ही एससी प्रवर्गातील असाल किंवा तुमचे काम सफाई कचरा वेचणे तसेच कातडी कमावण्याचे असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी या योजनेत नक्की अर्ज करू शकता या शिष्यवृत्तीचे पैसे थेट तुमच्या मुलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.

हे नक्की वाचा: सरकार देतंय ५ लाखांचे मोफत उपचार, आजच करा अर्ज!

Check Also

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना

⬛️  कोणाला लाभ घेता येणार? महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/तरुणींना दिला जाईल. ⬛️ काय …

महिलांसाठी मोठी संधी! मिळवा ₹15 लाख Business Loan, तेही बिनव्याजी!

मित्रांनो आपल्या कुटुंबाला भरभक्कम आधार देण्याकरिता प्रत्येक आई मध्ये आणि प्रत्येक महिलेमध्ये एक यशस्वी उद्योजिका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *