स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजनेची संपूर्ण माहिती

तुम्ही देखील दर महिन्याला येणाऱ्या भरभक्कम विजेच्या बिलाने खूप त्रस्त झाले आहात का? दर महिन्याला वाढत्या बिलाच्या आकड्यांमुळे तुमचे देखील महिन्याचे बजेट कोलमडत आहे का? तर आता कल्पना करा तुमच्या घराच्या छतावरती सूर्याचा प्रकाश पडतो आणि त त्याच्या ऊर्जेने तुमच्या तुमच्या घरातील सर्व जसे की टीव्ही पंखे तसेच इलेक्ट्रिक उपकरणे दिवसभर चालतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला महिन्याचे लाईट बिल अगदी शून्य येत.

तर आता हे फक्त स्वप्नच राहणार नाही तर महाराष्ट्र शासनाच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजनेमुळे शक्य देखील होणार आहे. आणि या योजनेमुळे वाढत्या वीजदराच्या चिंतेतून तुम्हाला कायमची सुटका मिळू शकते आणि महत्त्वाचं म्हणजे सौर ऊर्जेसारख्या स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचा वापर करून महिन्याच्या हजारो रुपये लाईट बिलातून मुक्ती मिळवण्याची हेच सुवर्णसंधी आहे.

आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेमुळे तुम्हाला केवळ महागड्या विज बिल पासून मुक्ती मिळत नाही तर सोलर पॅनल बसवण्याकरिता महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला मोठे अनुदान देखील दिले जाते याने सोलर पॅनल बसवण्याचा सुरुवातीचा आपल्याला खर्च येतो तो देखील कमी होतो म्हणजेच तुम्ही फक्त एकदा गुंतवणूक केली तर पुढील 25 वर्ष तुम्हाला वीज बिलातून मुक्ती मिळू शकते म्हणजेच तुमचे महिन्याचे वीज बिल अगदी शून्य येईल.

तर मग चला आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया की महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना नेमकी काय आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराला ऊर्जा स्वयंपूर्ण कसे बनवायचे.

स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना (overview)

योजनेचे नावस्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना
कोणामार्फत राबवली जातेमहाराष्ट्र शासन आणि महावितरण (MSEDCL)
मुख्य उद्देशसौर ऊर्जेला प्रोत्साहन देणे, नागरिकांना वीज बिलातून दिलासा देणे आणि प्रदूषण कमी करणे.
कोण अर्ज करू शकतोमहाराष्ट्रातील कोणताही घरगुती वीज ग्राहक, गृहनिर्माण संस्था (Housing Societies) आणि निवासी कल्याणकारी संघटना (Resident Welfare Associations)
अधिकृत वेबसाईटhttps://pmsuryaghar.gov.in/ आणि https://www.mahadiscom.in/ismart/
अधिकृत जीआरस्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना (GR)

स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप योजना काय आहे

महाराष्ट्र सरकारने गरजू गरीब लोकांसाठी सुरू केलेली स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना ही एक सरकारी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेअंतर्गत तुमच्या घराच्या छतावर ती सोलर पॅनल बसवून सूर्यप्रकाशाच्या मदतीने तुम्ही स्वतःची स्वतः तयार करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे याकरिता महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला आर्थिक मदत देखील मिळते तसेच ही योजना अगदी सोप्या पद्धतीने काम करते जसे की दिवसभर तुमच्या छतावरील सोलर पॅनल सूर्यप्रकाशाच्या मदतीने वीज तयार करतात जिथे तुमच्या घरातील पंखे लाईट टीव्ही फ्रिज तसेच इत्यादी साधने चालवण्यासाठी वापरली जाते.

विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरात विजेचा कमी वापर करत असाल तरीसुद्धा सोलर पॅनल जास्त वीज बनवतात. तेव्हा ही जास्तीची वीज नेट मेटरींग नावाच्या एका विशेष मीटर द्वारे ऑटोमॅटिकली महावितरणच्या मुख्य ग्रीडला पाठवले जात असते. आणि हा मीटर तुम्ही ग्रीडकडून किती वीज घेतली आहे म्हणजेच उदाहरणार्थ रात्रीच्या वेळी आणि ग्रीड ला किती वीज परत दिली या दोन्हीही बाबींचा हिशोब ठेवतो आणि महिन्याच्या शेवटी तुमच्या एकूण वीज वापरातून घेतला जाते आणि तुम्हाला फक्त उरलेल्या फलकाचे बिलच महावितरण करून दिले जाते आणि महत्त्वाचे म्हणजे हे बिल अनेकदा जवळपास 0 येते त्यामुळे तुमच्या वीज बिला मध्ये प्रचंड बचत होते आणि तुम्ही विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता.

स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजने’ची 5 प्रमुख उद्दिष्ट्ये

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजनेची तर अनेक उद्दिष्टे आहेत पण त्यामधली मी तुम्हाला महत्त्वाची पाच उद्दिष्टे सांगणार आहे.

  • सर्वात महत्त्वाचे आणि पहिले उद्दिष्ट म्हणजे अपारंपारिक आणि स्वच्छ ऊर्जा स्त्रोत वापरायला प्रोत्साहन देणे ज्यामुळे जीवाश्म इंधनावरील कोळसा पेट्रोल डिझेल याचा वापर कमी होतो.
  • यामुळे विजाच्या बिलात देखील कपात होते म्हणजेच घरगुती वीज ग्राहकांचा विजेवरील खर्च अत्यंत कमी होतो आणि त्यांना वाढत्या वीज दरांमधून आर्थिक दिलासा देखील मिळतो.
  • महत्त्वाचे कारण म्हणजे ग्रिट वरील भार कमी करणे महावितरणच्या पारंपरिक वीज ग्रेट वरील भार कमी करून लोड शेडिंग अशा मुख्य समस्यांपासून मुक्त होणे.
  • पर्यावरणाचे संरक्षण करणे. कारण पारंपारिक वीज निर्मितीमुळे होणारे कार्बनचे उत्सर्जन आणि प्रदूषण कमी करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत करणे.
  • नागरिकांना आणि पर्यायाने राज्याला ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणे जेणेकरून विजेसाठी महाराष्ट्राला कोणत्याही राज्यावर किंवा इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजने’साठी आवश्यक पात्रता आणि अटी

  • या योजनेचा अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • तसेच ही योजना फक्त घरगुती वीज ग्राहकांकरिता सुरू करण्यात आली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे व्यवसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी वीज कनेक्शन असलेले ग्राहक यासाठी पात्र नाहीत.
  • वैयक्तिक घर मालकांनी व्यतिरिक्त गृहनिर्माण संस्था आणि निवासी कल्याणकारी संघटना तसेच त्यांच्या सामायिक सुविधांसाठी म्हणजेच लिफ्ट, पाणी पंप, लाइटिंग, यांकरिता 500 किलो वॅट पर्यंतच्या क्षमतेच्या सोलर सिस्टिम साठी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या स्वतःच्या नावावरती घर असणे आवश्यक आहे.
  • जर अर्जदार भाड्याच्या घरात राहत असेल तर त्यांना घरमालकांकडून सोलर बसवण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे हे बंधनकारक आहे.
  • तुमच्या घरी सोलर पॅनल बसवण्यासाठी घराच्या छतावर पुरेशी जागा तसेच मजबूत आणि ज्या छतावरती दिवसभर थेट सूर्याचा प्रकाश मिळेल म्हणजे छतावर ती कोणत्याही प्रकारची सावली यायला नको अशी जागा असणे आवश्यक आहे म्हणजेच साधारणपणे एक किलो वॅट सोलर सिस्टीम करीता सुमारे शंभर चौरस फूट जागेची आवश्यकता असते.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या नावावरती महावितरण चे वैद्य आणि कार्यरत घरगुती वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे
  • जर अर्जदाराकडे कोणतेही वीज बिल थकीत असेल तर त्याला अर्ज करण्यापूर्वी सर्व जुनी बिले भरावे लागतील.
  • महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत जुना वीज मीटर काढून त्याच्या जागी नेट मीटर बसवला जातो आणि हा बदल करण्याकरिता अर्जदाराची संमती असणे आवश्यक आहे.

NOTE : अर्ज करण्यापूर्वी, महावितरण (MSEDCL) किंवा योजनेच्या अधिकृत pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवरील नवीनतम मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली तपासणे महत्त्वाचे आहे.

या योजनेतील आर्थिक लाभ आणि सबसिडीचे स्वरूप

घरगुती वीज ग्राहकांचा गट (प्रकार)ग्राहकाचा हिस्सा (रु.)राज्य शासनाचा हिस्सा (रु.)केंद्र शासनाचा हिस्सा (रु.)
दारिद्र्यरेषेखालील ग्राहक२,५००१७,५००३०,०००
१०० युनिटपेक्षा कमी वापर (सर्वसाधारण गट)१०,०००१०,०००३०,०००
१०० युनिटपेक्षा कमी वापर (अनुसूचित जाती)५,०००१५,०००३०,०००
१०० युनिटपेक्षा कमी वापर (अनुसूचित जमाती)५,०००१५,०००३०,०००

या योजनेतील आर्थिक लाभ आणि सबसिडीचे स्वरूप

या नवीन योजनेमुळे, केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या ₹ ३०,००० च्या अनुदाना व्यतिरिक्त राज्य सरकार सुद्धा एक मोठे अतिरिक्त अनुदान देत आहे. यामुळे दारिद्र्यरेषेखालील आणि १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहकांवरील खर्चाचा बोजा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. दारिद्र्यरेषेखालील ग्राहकाला आता केवळ ₹ २,५०० भरून १ किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवता येणार आहे, ज्यामुळे ते विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतील.

स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा (Identity Proof) – (कोणताही एक)

  • आधार कार्ड (Aadhaar Card)
  • पॅन कार्ड (PAN Card)
  • मतदान ओळखपत्र (Voter ID Card)

पत्त्याचा पुरावा (Address Proof) – (कोणताही एक)

  • आधार कार्ड (Aadhaar Card)
  • मतदान ओळखपत्र (Voter ID Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • वीज बिल (Electricity Bill) – (मागील ६ महिन्यांतील कोणतेही एक)
  • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)

नवीनतम वीज बिल (Latest Electricity Bill)

मागील ६ महिन्यांच्या आतील वीज बिलाची प्रत. यावर तुमचा ग्राहक क्रमांक (Consumer Number), पत्ता आणि बिलाचा तपशील स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.

मालमत्तेचा पुरावा (Property Ownership Document)

  • घरपट्टीची पावती (Municipal Tax Receipt)
  • खरेदी खत (Sale Deed)
  • इंडेक्स-२ (Index-II) उतारा

जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर घरमालकाकडून घेतलेले ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (No Objection Certificate – NOC) आवश्यक आहे.

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक तपशील (Bank Details)
  • मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी
  • सोलर सिस्टीम बसवायच्या जागेचा फोटो

NOTE: ऑनलाइन अर्ज करताना कागदपत्रे स्कॅन करून .jpg, .jpeg, किंवा .pdf फॉरमॅटमध्ये अपलोड करा. त्यामुळे ती आधीच तयार ठेवा.

स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजने’साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

नोंदणी (Registration)

  • या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फक्त आणि फक्त सरकारच्या https://pmsuryaghar.gov.in अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे
  • आता वेबसाईटवर Apply for Rooftop Solar किंवा नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा
  • आता अर्जामध्ये विचारलेली माहिती जसे की: तुमचे राज्य महाराष्ट्र निवडा, त्यानंतर जिल्हा निवडा, तसेच तुमची वीज कंपनी निवडा उदाहरणार्थ महावितरण तसेच अर्जामध्ये तुम्हाला वीजबिलावरील ग्राहक क्रमांक विचारला जाईल तो व्यवस्थित रित्या भरा, त्यानंतर तुमचा मोबाईल आयडी आणि ईमेल आयडी क्रमांक टाका, नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईल नंबर ने परत एकदा लॉगिन करा.

अर्ज सादर करणे (Application Submission)

  • यशस्वीरित्या Login झाल्यावरती रूप स्टॉप सोलर साठी अर्ज करण्याचे पर्याय तुम्हाला दिसतील त्यात तुमची वैयक्तिक माहिती भरा जसे की घराचा पत्ता प्रस्तावित सोलर सिस्टिम ची क्षमता उदाहरणार्थ 2kW, 3kW आणि तुमच्या बँक खात्याची माहिती भरा
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर महत्त्वाच्या टप्प्यामध्ये तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड करा उदाहरणार्थ: लेटेस्ट वीज बिल मालमत्ता कर पावती तुमचे आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून व्यवस्थित रित्या अपलोड करा.

तांत्रिक व्यवहार्यता मंजुरी (Technical Feasibility Approval – TFA)

  • वेबसाईट वरती अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यावर तो तुमच्या क्षेत्रीय महावितरण कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने सबमिट केला जातो आता कार्यालयातील अधिकारी तुमच्या अर्जाची तसेच तुमच्या परिसरातील वीज ग्रीडच्या क्षमतेची तांत्रिक तपासणी करतात.
  • तपासणी करत असताना मंजुरी मिळण्यासाठी काही दिवस किंवा काही आठवडे सुद्धा लागू शकतात तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्या स्थिती पोर्टलवर लॉगिन करून तपासता येते तसेच मंजुरी मिळाल्यावर तुम्हाला ईमेल आयडी किंवा एसएमएस द्वारे महावितरण करून कळवले जाते.

विक्रेता निवडणे आणि पॅनल बसवणे (Vendor Selection & Installation)

  • महावितरण करून तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला पोर्टलवर तुमच्या जिल्ह्यातील महावितरणाकडे नोंदणीकृत असलेल्या विक्रेत्यांची यादी दिसते आता या यादीमधील कोणत्याही एका नोंदणीकृत विक्रेत्यासोबत तुम्हाला संपर्क साधायचा आहे तसेच त्याच्याकडून कोटेशन फायनल करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्या आवडत्या विक्रेत्याची निवड करा.
  • तसेच विक्रेता आणि तुमच्या मध्ये एक करार केला जातो म्हणजेच एग्रीमेंट ही एग्रीमेंट झाल्यानंतर निवडलेल्या विक्रेता तुमच्या घरी येऊन सरकारी नियमानुसार तुम्हाला सोलर सिस्टिम बसवून देतो.

नेट मीटरसाठी अर्ज आणि तपासणी (Net Meter Request & Inspection)

  • तुमच्या घराच्या छतावर ती सोलर पॅनल बसवून झाल्यानंतर विक्रेता किंवा तुम्ही पोर्टलवर लॉगिन करून बसवलेल्या सोलर सिस्टिमचा तपशील उदाहरणार्थ सोलर पॅनल ची संख्या इन्व्हर्टर चे मॉडेल तसेच फोटो अपलोड करा.
  • आणि याचवेळी नेट मीटर बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करा.
  • आता महावितरणचे अधिकारी तुमच्या घरी येऊन बसवलेल्या सोलर सिस्टिम ची तपासणी करतील आणि आणि ते नियमानुसार आहे की नाही ते पाहतील.

प्रकल्प कार्यान्वित करणे आणि अनुदानाची विनंती (Commissioning & Subsidy Request)

  • एकदा तपासणी यशस्वी झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून तुमचा जुना मीटर काढण्यात येईल आणि त्याच्या जागी नवीन नेट मीटर बसवण्यात येईल.
  • हा नेट मीटर बसवल्यानंतर महावितरणाकडून तुम्हाला ‘कमिशनिंग रिपोर्ट’ रिपोर्ट किंवा प्रमाणपत्र दिले जाईल जे पोर्टलवर दिसेल याचा अर्थ तुमची सिस्टीम आता अधिकृतपणे ग्रीड सोबत जोडली गेली आहे.
  • प्रकल्प कार्यान्वित झाल्याचे प्रमाणपत्र मिळताच तुम्हाला पोर्टल वरती लॉगिन करायचे आहे आणि अनुदानासाठी अंतिम विनंती सादर करायची आहे यासाठी तुम्हाला तुमच्या बँक पासबुकची प्रत किंवा रद्द केलेला धनादेश म्हणजेच कॅन्सल चेक अपलोड करावा लागेल.

अनुदान मिळणे (Subsidy Disbursement)

  • तुमची अनुदानाची विनंती यशस्वी झाल्यानंतर साधारणपणे 30 दिवसांच्या आत मध्ये सरकारने ठरवलेली अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाते याचे उदाहरण म्हणजे ३ किलोवॅटसाठी ₹ ७८,०००

मित्रांनो अशा प्रकारे या सोपी प्रक्रियेने तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवू शकता आणि महिन्याला अत्यंत कमी विज बिल किंवा अगदी शून्य वीज बिल चा लाभ मिळवू शकता

संपर्क आणि हेल्पलाइन

संपर्काचा प्रकारतपशीलकशासाठी संपर्क साधावा?
राष्ट्रीय हेल्पलाइन (National Helpline)टोल-फ्री क्रमांक: 1800-180-3333योजनेची सर्वसाधारण माहिती, अर्ज प्रक्रियेतील अडचण, सबसिडीबद्दल चौकशी.
महावितरण (MSEDCL) हेल्पलाइनटोल-फ्री क्रमांक: 1912 / 19120 / 1800-233-3435 / 1800-212-3435तुमच्या अर्जाची सद्यस्थिती (Status), तांत्रिक मंजुरी, नेट-मीटरिंग, तपासणी आणि स्थानिक पातळीवरील अडचणींसाठी.
ईमेल आयडी (तांत्रिक शंका)ईमेल: certsho.msedcl@yahoo.comसोलर सिस्टीमच्या तांत्रिक बाबी, स्पेसिफिकेशन्स किंवा नियमावलीबद्दल शंका असल्यास.
ईमेल आयडी (आयटी/पोर्टल संबंधित)ईमेल: support_solarrf@mahadiscom.inऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणी, लॉगिन किंवा कागदपत्रे अपलोड करण्यासंबंधित समस्यांसाठी.
मुख्य कार्यालय (MSEDCL)पत्ता: प्रकाशगड, प्लॉट नं. जी-९, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१केवळ अत्यंत महत्त्वाच्या किंवा लेखी पत्रव्यवहारासाठी.

संपर्क आणि हेल्पलाइन

NOTE : तुम्हाला अर्जामध्ये किंवा सोलर पॅनल बसवताना कोणतेही अडचण आल्यास तर सर्वप्रथम तुम्ही अर्जामध्ये निवडलेल्या नोंदणीकृत विक्रेत्यासोबत संपर्क साधा ते सर्वात जलद आणि सोपे  ठरवू शकते आणि तिथे तुमच्या समस्येची समाधान लवकर निघू शकते

सोलर सिस्टीम बसवल्यानंतर तिचा देखभाल (Maintenance) खर्च किती असतो?

तुमच्या घरावरती एकदा तुम्ही सोलर सिस्टिम बसवली तर सोलर सिस्टिमचा देखभाल चा खर्च जवळपास नसण्यागत असतो म्हणजेच याला नियमितपणे सर्विसिंगची गरज लागत नाही मुख्य देखभाल म्हणजे सोलर पॅनल स्वच्छ ठेवणे पॅनलवर धूळ किंवा पालापाचोळा असेल तर त्याची वीज बनवण्याची क्षमता कमी होते त्यामुळे दर पंधरा ते वीस दिवसाच्या मधून एकदा सोलर पॅनल पाण्याने धुऊन घ्या किंवा एका मऊ कापडाने स्वच्छ करून घ्या हे काम तुम्ही स्वतः करू शकता किंवा यासाठी स्थानिक पातळीवरील देखभाल करार AMC सुद्धा उपलब्ध असतात ज्यांचा खर्च देखील खूप कमी असतो

रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात जेव्हा सूर्यप्रकाश नसतो, तेव्हा घरातील वीज चालू राहते का?

होय तुमची रात्रीच्या वेळेस देखील वीज अगदी सुरळीतपणे चालू राहते तुमची सोलर सिस्टिम महावितरणाच्या मुख्य ग्रेडला जोडलेली असते याला ऑन ग्रेट सिस्टीम असे देखील म्हणतात म्हणजेच उदाहरणार्थ बघा तुमची उपकरणे दिवसा सोलर वरती चालतात आणि रात्री किंवा पावसाळ्यात जेव्हा सोलर सिस्टिम वीज फार कमी बनवते किंवा बनवतच नाही तेव्हा तुमची उपकरणे आपोआप महावितरणाच्या ग्रेड वरून वीज घेतात म्हणजे घरातील उपकरणे पूर्वीप्रमाणेच चालू राहतात तुम्हाला यात कोणताही बदल जाणवत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे नेट मीटर या दोन्ही गोष्टींचा हिशोब आपोआप ठेवते.

Check Also

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना

⬛️  कोणाला लाभ घेता येणार? महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/तरुणींना दिला जाईल. ⬛️ काय …

महिलांसाठी मोठी संधी! मिळवा ₹15 लाख Business Loan, तेही बिनव्याजी!

मित्रांनो आपल्या कुटुंबाला भरभक्कम आधार देण्याकरिता प्रत्येक आई मध्ये आणि प्रत्येक महिलेमध्ये एक यशस्वी उद्योजिका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *