राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत एकूण ४३४ रिक्त पदांवर शिकाऊ उमेदवारांची मेगा भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर सादर करावा तसेच आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन नमुना अर्ज रत्नागिरी एसटी विभाग कार्यालयात दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. शिकाऊ उमेदवारीचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असणार आहे.
चालक, वाहक-५४५
लिपिक-५०
यांत्रिक-३२०
वाहतूक नियंत्रक- २५
एकूण ९४०
नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाल्यास जिल्ह्यासह राज्यभरात एसटीमध्ये महानोकरभरती होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आगारासह इतर डेपोत रिक्त पदाचा आढावा घेतल्यास तब्बल ९४० पदे रिक्त आहेत. त्यामुळे एसटीच्या कामकाजात सुरळीतपणा येत नाही. चालक, वाहक नसल्यामुळे अनेक ठिकाणी गाड्या वेळेवर येत नाही. अशी परिस्थिती सध्या रत्नागिरी आगाराची आहे. रिक्त पदासंदर्भात विभाग नियंत्रक बोरसे यांना विचारल्यास एसटीमध्ये चालक, वाहक, लिपीक, यांत्रिक, वाहतूक नियंत्रकाच्या जागा रिक्त आहेत. महिन्याला आम्ही रिक्त पदासंदर्भात महामंडळाकडे मागणी करीत असतो. प्रस्ताव मंजूर झाल्यास रिक्त पदांच्या जागा भरल्या जातील.
दरम्यान, एसटी महामंडळात नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाल्यास रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह कोकण विभागातील स्थानिक भूमिपूत्र, कोकणातील चाकरमान्यांना संधी द्यावी अशी मागणी स्थानिक कोकणकर, विविध संघटना, संस्था करीत आहेत. रिक्त पदांमुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे
कोल्हापूर विभागात कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, आजरा, संभाजीनगर, गारगोटी, चंदगड, कुरुंदवाड, राधानगरी, गगनबावडा व आजरा असे आगार असून, विभागातील गाड्यांची एकूण संख्या ७१७ इतकी आहे. त्यामानाने वाहक व चालकांची संख्या पूर्णपणे भरलेली नाही. शासनस्तरावर पदांच्या भरतीसाठी वेळोवेळी मागणी होऊनही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक डिझेल ॲटो इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनर, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, वेल्डर अशा विविध ३१० पदांसाठी यंदा जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ही पदे केवळ एक वर्षाच्या कालावधीसाठी असतील, असे नमूद करण्यात आले होते.
विशेष म्हणजे त्यांना महिन्याकाठी दहा हजार रुपये इतके मानधन दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ही पदे भरण्यात असली, तरी ती कायमस्वरूपी भरणे महत्त्वाचे आहे. प्रशासनातील पदांची भरती न झाल्याने त्याचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कार्यशाळा असो किंवा वाहतूक त्याची स्थिती याहून निराळी नाही. राज्यातील अन्य विभागांशी स्पर्धा करताना कोल्हापूर विभागाला येत्या मार्च २०२५ पर्यंत पहिल्या तीन क्रमांकात येण्याचे आव्हान पेलायचे आहे. ते पेलण्यासाठी पदांची भरती होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी, इतकीच प्रवासी वर्गाची अपेक्षा आहे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खात्याअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत पास झालेल्या लेखाकारांना बढतीची प्रतीक्षा आहे, पाच महिन्यांपासून परीक्षेनंतरची सर्व प्रक्रिया थंडावली आहे. राज्यभरातील ३३ लेखाकारांनी ही परीक्षा यशस्वी केली आहे.
विभागीय लेखाकार, अधिकारी वर्ग- २ (कनिष्ठ) या प्रवर्गाच्या बढतीकरिता महामंडळाने जून २०२४ मध्ये परीक्षा घेतली होती. मात्र महामंडळाने पुढील प्रक्रिया सुरूच केली नाही. विविध जात प्रवर्गातील लेखाकार या परीक्षेत यशस्वी झालेले आहे. महामंडळाच्या जवळपास प्रत्येक विभागातील लेखाकारांचा यामध्ये समावेश आहे..
प्रभारावर कारभार
महामंडळाच्या राज्यातील विविध विभागांत विभागीय लेखाकार, अधिकारी वर्ग-२ या प्रवर्गातील पदे रिक्त आहे. लेखाकारांकडे प्रभार देऊन लेखा विषयक कामे ढकलली जात आहे. सहा महिन्यांपूर्वी परीक्षा घेतलेल्या लेखाकारांमधून या जागा भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविषयी उमेदवारांनी महामंडळाच्या यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा केला, याची दखल घेतली जात नसल्याची ओरड होत आहे.
आर्थिक नुकसान
विभागीय लेखाकार म्हणून बढती मिळाल्यास एक वेतनवाढ होते. यामुळे दरमाह वेतनात ७०० ते ८०० रुपये अधिक मिळतात. बढतीच मिळाली नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. मागील पाच महिन्यांपासून त्यांना हे नुकसान सहन करावे लागत आहे.
या विभागातील लेखाकार प्रतीक्षेत
ठाणे, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, अकोला, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सांगली, अमरावती, धुळे, गडचिरोली, पुणे, धाराशिव, नाशिक, कोल्हापूर, बीड, सोलापूर, सातारा, पालघर, जळगाव आदी विभागांतील परीक्षा पास लेखाकार बढतीच्या प्रतीक्षेत आहेत.
MSRTC HelpLine 2025
प्रवाशांना गाडीविषयी माहिती मिळण्यासाठी प्रशासनाने या क्रमांकावर माहिती ८७६६०५४२३५ हा क्रमांक सुरू केला आहे. त्यावर प्रवाशांनी गाडीच्या माहितीचा संदेश पाठविल्यावर काही मिनिटांत संदेशाला उत्तर दिले जाईल. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या गाडीची माहिती मिळण्यास मदत होईल.
- पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
- पदसंख्या – — जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
- मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs