
| योजनेची ठळक वैशिष्टे |
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
- सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
- अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5 टक्के
- उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
- जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 एचपीचे पंप
- पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
- वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
| लाभार्थी निवडीचे निकष |
- 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
- ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
- अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2 व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.
| जमिनीच्या क्षेत्रानुसार दिला जाणारा पंप | |
| HPDC | आवश्यक भू-धारणाक्षेत्र |
| 3 HP | 2.5 एकरापर्यंत |
| 5 HP | 2.51 ते 5 एकरापर्यं |
| 7.5 HP | 5 एकरा पेक्षा जास्त |
| लाभार्थ्यांनी भरायचा हिस्सा / रक्कम | ||
| HPDC | SC-ST प्रवर्ग रक्कम (5%रक्कम) | इतर प्रवर्ग रक्कम (10%रक्कम) |
| 3 HP | 11486/- | 22971/- |
| 5 HP | 16038/- | 32075/- |
| 7.5 HP | 22464/- | 44928/- |
| आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
- 7/12 उताऱ्यावर विहिर किंवा कुपनलिका नोंद आवश्यक
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs