
अनेक विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे तसेच मोठ्या शहरात जाण्याचे स्वप्न असते पण त्यांना गव्हर्मेंट होस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही आणि हीच अनेक होतकरू विद्यार्थ्यांसमोर ही एक मोठी अडचण उभे राहते आणि काहींना तर आर्थिक परिस्थितीमुळे आपलं शिक्षण अर्धवट देखील सोडावा लागतं.
पण विद्यार्थी मित्रांनो आता काळजी करण्याची काहीही गरज नाही कारण महाराष्ट्र सरकारने अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana सुरू केली आहे आणि ही योजना विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आधारच बनली आहे.
जर तुम्हाला देखील होस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नसेल तर ही योजना तुमच्यासाठी जणू काही वरदानच ठरणार आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सरकार तुमच्या राहण्याचा जेवणाचा आणि इतर शैक्षणिक खर्चाचा भार स्वतःवर घेते म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या सर्व खर्चाचे पैसे थेट सरकार मार्फत तुमच्या बँक खात्यात दरवर्षी जमा केले जातात.
तर हो मित्रांनो होस्टेलची वाट न पाहता स्वतःच्या सोयीने राहून तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता आणि तुमचा भविष्य उज्वल करू शकता तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना काय आहे याचा लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतो या योजनेमार्फत किती पैसे मिळतात आणि अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
| मुद्दा | तपशील |
| योजनेचे नाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना |
| विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन) |
| लाभार्थी | अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी |
| मुख्य लाभ | शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास, निवास, भोजन इत्यादी खर्चासाठी थेट बँक खात्यात आर्थिक मदत (उदा. रु.51,000/- वार्षिक) |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अधिकृत वेबसाईट | mahadbtmahait.gov.in (महाडीबीटी पोर्टल) |
स्वाधार योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये काय आहेत?
- गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये अनुसूचित जाती (SC) व नव बौद्ध विद्यार्थ्यांना जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना त्यांच्या शिक्षण सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदत करणे.
- विद्यार्थ्यांना बाहेरगावी राहण्याचा तसेच त्यांच्या जेवणाचा व इतर शैक्षणिक खर्चासाठी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करणे.
- कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे किंवा शहरात राहण्याची सोय नसल्यामुळे कोणत्याही गरजू गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये याची काळजी घेणे.
- ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना मोठ्या शिक्षणामध्ये येऊन दहावीनंतरचे शिक्षण उदाहरणार्थ अकरावी/बारावी/पदवी/डिप्लोमा हे सर्व शिक्षण घेण्याकरिता आर्थिक आधार देणे.
- कोणत्याही होस्टेल वरती अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना स्वतःच्या सोयीनुसार राहण्याचे व्यवस्था करून देणे आणि त्यांच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वावलंबी बनवणे.
हे नक्की वाचा : लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणारा एकूण १,०१,०००/- रुपये आर्थिक मदत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी आवश्यक पात्रता निकष
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थ्याने गव्हर्मेंट होस्टेलमध्ये प्रवेशाकरिता अर्ज केलेला असावा परंतु त्याला गव्हर्मेंट होस्टेलमध्ये प्रवेश मिळालेला नसावा.
- विद्यार्थी ज्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये शिक्षण घेत आहे तेथील स्थानिक रहिवासी नसावा.
शैक्षणिक आणि टक्केवारीच्या अटी
- अकरावी मध्ये प्रवेशा करिता अर्जदार विद्यार्थ्याला दहावी मध्ये किमान 50% टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- पदवी किंवा पदविका प्रवेशासाठी अर्जदार विद्यार्थ्याला बारावी मध्ये किमान 50% टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याला जर पुढील वर्षासाठी देखील या योजनेचा लाभ सुरळीतपणे सुरू ठेवायचा असेल तर विद्यार्थ्याला मागील वर्षांमध्ये किमान 50% टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे.
- अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील अपंग विद्यार्थ्यांसाठी 40%टक्के आरक्षण दिले जाते.
- अपंग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट 40% टक्के इतकी शिथिल करण्यात येते फक्त त्यांच्याकडे चाळीस टक्के किंवा अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
इतर महत्त्वाच्या अटी
- अर्जदार विद्यार्थ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि हे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थी कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेत नसावा जर विद्यार्थी इतर शासकीय योजनेतून निर्वाह भत्ता घेत असेल तर असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र मानले जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांची कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये किमान 75 टक्के अटेंडन्स असणे आवश्यक आहे.
Financial Benefits
| खर्चाचा तपशील | मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर | इतर महसुली शहरे व ‘क’ वर्ग महानगरपालिका | उर्वरित तालुके/ठिकाणे |
| भोजन भत्ता | ₹ 32,000/- | ₹ 28,000/- | ₹ 25,000/- |
| निवास भत्ता | ₹ 20,000/- | ₹ 15,000- | ₹ 12,000/- |
| निर्वाह भत्ता | ₹ 8,000/- | ₹ 8,000/- | ₹ 6,000/- |
| एकूण वार्षिक लाभ | ₹ 60,000/- | ₹ 51,000/- | ₹ 43,000/- |
NOTE: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मिळणारे सर्व रक्कम अर्जदार विद्यार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी मार्फत थेट जमा करण्यात येते.
स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक
- आधार-लिंक पुरावा (उदा. NPCI मॅपिंग पावती)
शैक्षणिक कागदपत्रे
- 11वी साठी: 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका (किमान 50% गुण).
- पदवी/पदविका साठी: 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका (किमान 50% गुण).
- (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 40% गुणांची अट).
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- महाविद्यालयात फी भरल्याची पावती.
इतर महत्त्वाची कागदपत्रे
- शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्याचे प्रमाणपत्र
- स्थानिक रहिवासी नसल्याचा पुरावा
- भाडे नामा करार.
- दिव्यांग प्रमाणपत्र ( जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर)
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
NOTE: विद्यार्थी मित्रांनो अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये शिकत आहात तेथील समाज कल्याण विभाग किंवा जवळच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून नवीन कागदपत्रांची यादी एकदा नक्की तपासा कारण बऱ्याचदा या कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अर्ज प्रक्रिया
विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेची अर्ज प्रक्रिया ही दोन मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन पोर्टल वरती अर्ज भरावा लागतो आणि हा अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आणि संबंधित कागदपत्रे तुमच्या महाविद्यालयांमध्ये जमा करावी लागतात किंवा तुम्ही ही कागदपत्रे थेट तुमच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये देखील जमा करू शकता.
ऑनलाईन अर्ज (महाडीबीटी पोर्टलवर)
- विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mahadbtmahait.gov.in अधिकृत वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेबसाईटच्या होम पेजला भेट द्या त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी यावरती क्लिक करा.
- आता तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी पूर्ण करा. (मित्रांनो मोबाईल क्रमांक आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे)
- नवीन नोंदणी झाल्यानंतर तुमचा एक नवीन युजर आयडी आणि पासवर्ड तयार होईल तो अगदी जपून ठेवा.
- आता वेबसाईट मध्ये परत तुमच्या युजर आयडी आणि पासवर्ड लॉगिन करा.
- लॉगिन झाल्यानंतर तुमची प्रोफाइल तुम्हाला दिसेल आता ही प्रोफाइल शंभर टक्के पूर्ण करणे अनिवार्य आहे.
- यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक माहिती, दहावी किंवा बारावी मध्ये मिळालेले गुण तसेच तुमच्या वार्षिक उत्पन्नाचे तपशील आणि या सोबतच तुमच्या बँक खात्याचे तपशील जे बँक खाते तुमची आधार कार्ड सोबत लिंक आहे अशी सर्व माहिती अचूक रित्या भरा.
- सर्व माहिती भरल्यानंतर सेव या ऑप्शन वरती क्लिक करा.
- किती प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर डॅशबोर्ड वरील All Schemes या बटणावर क्लिक करा.
- आता तुम्हाला डिपार्टमेंट सेक्शन मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य हा विभाग निवडायचा आहे.
- येथे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना दिसेल.
- या योजनेसमोरील Apply Now या बटनावर क्लिक करा.
- आता योजनेचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल अर्जामध्ये विचारलेले अतिरिक्त माहिती अगदी व्यवस्थित रित्या भरा उदारणार्थ होस्टेलला अर्ज केलेला होता का?
- मित्रांनो लेखांमध्ये सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अगदी स्पष्ट दिसतील अशी अपलोड करा.
- सर्व माहिती आता अगदी व्यवस्थित रित्या तपासून घ्या त्यानंतर अर्ज submit करा या बटणावर क्लिक करा.
- मित्रांनो अर्ज सबमिट केल्यानंतर my applied schemes मध्ये जाऊन तुम्ही सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.
ऑफलाईन कागदपत्रे जमा करा
- तुम्ही ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्या.
- विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या फोटोकॉपी घ्या आणि अर्जासोबत स्टेपलर करून जोडा.
- आता हा पूर्ण अर्जाचा संच म्हणजेच अर्जाचे प्रिंट आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्रे तुमच्या महाविद्यालयाच्या स्कॉलरशिप विभागामध्ये सबमिट करा किंवा तुम्ही थेट जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये देखील जमा करू शकता फक्त तुम्हालाही कागदपत्रे महाविद्यालयाने किंवा कार्यालयाने दिलेल्या मुदतीच्या आत मध्ये जमा करायची आहेत.
NOTE: मित्रांनो तुम्ही जर वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज भरला तर ती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असे समजू नका जोपर्यंत तुम्ही अर्जाची हार्ड कॉपी आणि कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे किंवा तुमच्या महाविद्यालयाकडे वेरिफिकेशन करण्यासाठी जमा करत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करताना काही सामान्य चुका टाळा
मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमचे स्वतःचे बँक खाते असायला हवे आणि हे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे आणि इथेच विद्यार्थी सर्वात मोठी चूक करतात आता दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे उत्पन्नाचा दाखला हा चालू आर्थिक वर्षाचा असावा आणि तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे जास्त असेल तर तुमचा अर्ज अपात्र करण्यात येईल येथेही काही विद्यार्थी चूक करतात उत्पन्न जास्त असून देखील.
आणखी शोधा
शिक्षण
या योजनेसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करतात आणि एक सर्वसामान्य चूक म्हणजे फक्त ऑनलाईन अर्ज सबमिट करून अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असे समजणे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट आणि आवश्यक कागदपत्रे जोडून ती तुम्हाला तुमच्या महाविद्यालयांमध्ये किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये ऑफलाइन पद्धतीने जमा करणे अनिवार्य असते आता तुम्ही जर ही कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने जमा केली नाही.
तर तुमचा अर्ज अपूर्ण आहे असा मानला जातो त्यामुळे अर्ज रण्यापूर्वी सर्व मूळ कागदपत्रे जसे की जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला गुणपत्रिका तयार ठेवा आणि ती स्कॅन करून अपलोड नक्की करा आणि अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या महाडीबीटी लॉगिन मध्ये भारताचे Status वेळोवेळी तपासत रहा. जर अर्ज पेंडिंग असल्यास किंवा अर्जामध्ये काही चूक असल्यास तो परत एकदा दुरुस्त करून व्यवस्थित रित्या Submit करा.
Contact & Helpline
| Details | Contact/Link |
| अधिकृत अर्ज पोर्टल | https://mahadbtmahait.gov.in |
| MahaDBT हेल्पलाईन क्र. | 022-49150800 |
| MahaDBT हेल्पलाईन ईमेल | mahadbt.support@maharashtra.gov.in |
| संबंधित कार्यालय | तुमच्या जिल्ह्याचे ‘सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय’ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
स्वाधार योजना म्हणजे नक्की काय?
मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना ही एक गव्हर्मेंट होस्टेलला पर्याय म्हणून सुरू करण्यात आली आहे जर तुम्ही SC/नवबौद्ध प्रवर्गामधील विद्यार्थी असाल आणि तुम्हाला हॉस्टेलमध्ये जर प्रवेश मिळत नसेल तर महाराष्ट्र सरकार तुमच्या राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च आणि इतर खर्चासाठी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी पैसे जमा करते. जेणेकरून तुमचे शिक्षण थांबू नये.
मी सध्या Second Year किंवा Third Year वर्षाला शिकत आहे, मला अर्ज करता येईल का?
हो मित्रांनो नक्कीच तुम्हाला अर्ज करता येतो पण यासाठी अट एवढीच आहे की तुम्हाला मागील वर्षाच्या परीक्षेमध्ये किंवा 50% गुण मिळाले असावे आणि जर तुम्ही दिव्यांग विद्यार्थी असाल तर तुम्ही जर 40% टक्के गुण मिळवलेले असतील तरीसुद्धा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs