बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत राबविण्यात येणारा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रक्रिया प्रारंभ – 2025

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष घटक गटांमधील पात्र उमेदवारांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण (Pre-Exam Coaching) देण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात.

बार्टी (BARTI), टीआरटीआय (TRTI), सारथी, महाज्योती आणि आर्टी या संस्था आपल्या संबंधित गटांतील विद्यार्थ्यांसाठी UPSC, MPSC, Banking, SSC, JEE, NEET, NET/SET, इतर राज्य व केंद्र सरकारच्या भरती स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवतात.

या योजनांतर्गत उमेदवारांना खालील सुविधा दिल्या जातात:

  • विषयानुरूप अभ्यासक्रम व प्रशिक्षण
  • सुसज्ज अभ्यास साहित्य, नोट्स व स्टडी मटेरियल
  • विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन व व्याख्याने
  • नियमित चाचण्या (Test Series)
  • मुलाखतीसाठी विशेष मार्गदर्शन
  • निवास, भोजन, स्टेशनरी व अन्य आवश्यक सुविधा (संस्थेनुसार)

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी Common Entrance Test (CET) द्वारे अर्ज करणे आवश्यक असते. CET मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी व संस्थेची अंतिम निवड केली जाते.


सन 2025-26 करिता महाराष्ट्र राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test – CET) घेण्यात येणार आहे. या करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून संबंधित संस्थेनुसार योजनांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील बाबींची माहिती दिली आहे:

  • आवश्यक शैक्षणिक पात्रता
  • संबंधित कागदपत्रांची यादी
  • प्रशिक्षणातील सोयी-सुविधा
  • आणि सामायिक प्रवेश परीक्षा (CET) भरताना घ्यावयाची काळजी

या सर्व बाबींची सविस्तर माहिती जाहिरातीत देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

महत्वाच्या सूचना (Online अर्ज भरण्यापूर्वी वाचाव्यात):

1.अर्ज सादर करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा:

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सर्व सूचना पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज भरण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अर्ज सादर केल्यास, त्यामध्ये काही त्रुटी अथवा अडचणी उद्भवल्यास उमेदवाराला पुन्हा अर्ज सादर करण्याची संधी दिली जाणार नाही. ही बाब उमेदवारांनी लक्षात घ्यावी.

2. एकाच वेळी एकाच योजनेसाठी अर्ज सादर:

  • उमेदवार एका वेळी फक्त एका योजनेसाठीच ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो.
  • जर उमेदवाराला इतर योजनांसाठीही अर्ज करायचा असेल, तर Registration नंतर मिळालेल्या Login ID आणि Password चा वापर करून, Dashboard वरील “Apply for new scheme” या टॅबवर क्लिक करून इतर योजनांसाठी अर्ज करता येईल.
  • तथापि, इतर योजनांसाठी अर्ज करताना त्या-त्या योजनेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी उमेदवार पूर्ण करत असल्याची खात्री असावी.

3. महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे : या प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचा अधिवास/राहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे बंधनकारक आहे.

4. जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे : बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय व आर्टी या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) आवश्यक आहे.

5. टीआरटीआयसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे:

  • टीआरटीआय साठी अर्ज करताना अनुसूचित जातीच्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) असणे बंधनकारक आहे.
  • तसेच उमेदवाराची जात महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जातींच्या यादीत असणे आवश्यक आहे.
  • ज्यांनी जात वैधतेसाठी अर्ज केलेला आहे पण प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही, ते “Application Number” चा वापर करून अर्ज करू शकतात. तथापि, अशा उमेदवारांची योजना निवड झाल्यास मूळ
  • जात वैधता प्रमाणपत्र दस्तऐवज पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.

6. उत्पन्न मर्यादा – रु. 8,00,000/- पर्यंत:

  • बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय व आर्टी मार्फत मिळणाऱ्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार व त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ८,००,०००/- पेक्षा जास्त नसावे.
  • अधिक उत्पन्न असल्यास उमेदवारास योजना मिळणार नाही.
  • तहसीलदार कार्यालयाकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

7. सारथी योजनेंतर्गत अर्ज करताना : उमेदवाराकडे मागील तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांच्या सहीने प्रमाणित) किंवा नॉन-क्रीमीलेयर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

8. महाज्योती योजनेंतर्गत अर्ज करताना : उमेदवाराकडे नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

9. दिव्यांग उमेदवारांसाठी : दिव्यांग उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

10. अनाथ उमेदवारांसाठी : अनाथ उमेदवारांनी अर्ज करताना महिला व बाल विकास विभागाने प्रमाणित केलेला अनाथ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

11. शासकीय सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी योजना लागू नाही:

  • जे उमेदवार सध्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत, त्यांना या प्रशिक्षण योजनांचा लाभ मिळणार नाही.
  • खोटी माहिती दिल्यास किंवा माहिती लपविल्यास उमेदवाराचा प्रवेश तात्काळ रद्द केला जाईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याशिवाय, अशा उमेदवारांना संस्थेच्या भविष्यातील कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.

12. अर्ज डाउनलोडची अंतिम मुदत : उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर, अर्ज डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या अंतिम तारखेच्या आतच अर्ज प्रिंट करून घ्यावा. त्या मुदतीनंतर कार्यालयाकडून अर्जाची प्रत कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करून देण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

13. परीक्षा केंद्र निवड अंतिम : अर्ज करताना उमेदवाराने परीक्षा केंद्रासाठी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार निवड केलेल्या केंद्रावरच परीक्षा द्यावी लागेल. एकदा केंद्र निवडल्यानंतर ते बदलता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

14. परीक्षा केंद्र नियुक्तीचा अधिकार संस्थेकडे : उमेदवाराने कोणतेही परीक्षा केंद्र, शहर किंवा ठिकाण निवडले नसल्यास, अथवा विशेष परिस्थितीत, बर्टी (BARTI) व संबंधित संस्था अर्जदाराला उपलब्ध क्षमतेनुसार कोणतेही केंद्र नेमण्याचा पूर्ण अधिकार राखून ठेवतात.

15. नागरी सेवा पूर्व परीक्षा (CET) : संध लोकसेवा आयोग (Civil Services) पूर्व प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे परीक्षा केंद्र उपलब्ध आहे. इतर सर्व ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील केंद्रांवरच होणार आहेत. ज्यांना एकापेक्षा अधिक योजनांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी स्वतःच्या जबाबदारीने परीक्षा केंद्रे निवडावीत. एकदा केंद्र निवडल्यानंतर कोणताही बदल शक्य नाही.

16. युजर आयडी व पासवर्ड सुरक्षित ठेवावेत : अर्ज करताना मिळालेला User ID आणि Password काळजीपूर्वक सुरक्षित ठेवावा. हे तपशील पुन्हा देण्यात येणार नाहीत.

17. आधार क्रमांक व मोबाइल नंबर योग्य प्रकारे भरावेत : अर्ज भरताना स्वतःचा आधार क्रमांक आणि वैध मोबाइल क्रमांक अचूक आणि पूर्ण भरावा.

18. खोटे कागदपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई : उमेदवाराने खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्र सादर करून लाभ घेतल्याचे आढळल्यास, संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च वसूल केला जाईल व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

19. प्रवेशपत्र व सूचना संकेतस्थळावरूनच डाउनलोड कराव्यात : CET परीक्षेचे Admit Card / Hall Ticket आणि परीक्षा विषयक सूचना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच डाउनलोड कराव्यात.

20. CET परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल :
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी होणाऱ्या CET परीक्षेचे वेळापत्रक http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

21. अनेक योजनेकरिता अर्ज केल्यास परीक्षा वेळेची जबाबदारी उमेदवाराची :

  • जर उमेदवाराने अनेक योजनांसाठी अर्ज केले असतील, तर त्यांनी प्रकाशित वेळापत्रकानुसार योग्य वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • परीक्षेच्या वेळा किंवा केंद्रात कोणताही बदल केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी

22. CET परीक्षेसाठी मूळ कागदपत्रांची पूर्वतपासणी नाही :

  • CET (सामान्य प्रवेश परीक्षा) साठी उमेदवारांना मूळ कागदपत्रे न तपासता परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, CET मध्ये पात्र ठरल्यानंतरच मूळ कागदपत्रांची तपासणी होईल आणि अंतिम निवड केली जाईल.
  • जर कागदपत्रांची तपासणी करताना नमूद प्रमाणे मूळ कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी झाल्यास, उमेदवाराची निवड रद्द केली जाईल.

23. निकाल आणि सूचना केवळ संकेतस्थळावरच प्रसिद्ध होतील : CET परीक्षा निश्चित वेळापत्रकानुसार घेतली जाईल आणि सर्व योजनांचा निकाल परीक्षेनंतर ७ ते १० दिवसांत http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. यासंबंधी कोणत्याही उमेदवाराशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला जाणार नाही.

24. प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक :

  • CET उत्तीर्ण होऊन मूळ कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर संबंधित प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यास, शासनाने ठरवलेल्या कालावधीत संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे.
  • प्रशिक्षणादरम्यान इतर कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण अर्धवट सोडता येणार नाही.

25. मूळ कागदपत्र तपासणीस उपस्थित राहणे आवश्यक :

  • उमेदवारांनी संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर दिलेल्या तपशीलवार कालावधीत मूळ कागदपत्र तपासणीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • तय ठराविक कालावधीत कागदपत्रांची तपासणी न केल्यास किंवा संपर्क न केल्यास उमेदवाराचा प्रवेश रद्द करण्यात येईल.

26. प्रशिक्षणादरम्यान अनुशासनभंग केल्यास कारवाई :
प्रशिक्षण कालावधीत जर उमेदवार धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, उद्धट वर्तन किंवा अन्य गैरप्रकार करताना आढळला, तर त्याची निवड रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

27. PVTG उमेदवारांना प्राधान्य : अनुसूचित जातीतील खास दुर्बल जमातींच्या (PVTG) उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

28. आरक्षित जागांबाबत सूचना :

  • महिला, दिव्यांग व अनाथ उमेदवारांसाठी नियत नियमांनुसार आरक्षित जागा ठेवण्यात येतील.
  • जर योग्य पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास, त्या जागा गुणानुक्रमानुसार इतर पात्र उमेदवारांना दिल्या जातील.

29. 75% उपस्थिती अनिवार्य : प्रशिक्षण कालावधीत किमान 75% उपस्थिती अनिवार्य आहे. त्याखाली उपस्थिती असल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो.

31. प्रशिक्षण साहित्य व सुविधा संबंधित संस्थेकडून उपलब्ध :
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत, सामान्य अध्ययन या विषयाची पूर्व व मुख्य परीक्षा, मुलाखत व वैकल्पिक विषयांची तयारी, योग्य व्याख्याते, अभ्यास साहित्य (स्टडी मटेरीअल, नोट्स, वाचन साहित्य), टेस्ट सिरीज, वर्तमानपत्र, मासिके, आवश्यक पुस्तके व स्टेशनरी इत्यादी सर्व सुविधा संबंधित नामनिर्दिष्ट प्रशिक्षण संस्थेकडून पुरवण्यात येतील.

32. संस्थांच्या नियमांचे पालन बंधनकारक : सामान्य प्रवेश परीक्षा (CET) व निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्था त्यांच्या लक्षित गटांतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम त्यांच्याच नियम व धोरणांनुसार राबवतील.

33. प्रशिक्षण कालावधीत इतर नोकरी करू नये :
प्रशिक्षणाच्या कालावधीत उमेदवार कुठल्याही शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी नोकरीत कार्यरत राहू शकत नाही. अशी नोकरी करत असल्याचे आढळल्यास किंवा याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास उमेदवाराचा प्रवेश रद्द करण्यात येईल आणि नियमांनुसार योग्य कारवाई केली जाईल.


कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व कागदपत्रांची यादी:

उमेदवारांकडे खालीलप्रमाणे मूळ प्रमाणपत्रे/स्कॅन प्रती उपलब्ध असणे आवश्यक आहे:

  1. जात/जमातीचे मूळ प्रमाणपत्र (स्कॅन प्रत)
  2. जमातीच्या वैधतेचे प्रमाणपत्र (स्कॅन प्रत)
  3. दहावीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र (स्कॅन प्रत)
  4. बारावीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र (स्कॅन प्रत)
  5. पदवीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र (स्कॅन प्रत)
  6. राहिवासी दाखला (मूळ प्रमाणपत्राची स्कॅन प्रत)
  7. आधारकार्ड (मूळ छायाचित्र असलेली स्कॅन प्रत)
  8. बँक पासबुक – उमेदवाराच्या नावावर असलेले व आधारकार्डशी लिंक असलेले (स्कॅन प्रत)
  9. उत्पन्नाचा दाखला – तहसीलदार कार्यालयाकडून प्रमाणित (स्कॅन प्रत)
  10. विधवा असल्यास – तलाठी/सरपंच यांनी प्रमाणित केलेला विधवत्वाचा दाखला (स्कॅन प्रत)
  11. अनाथ असल्यास – महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या उपायुक्तांनी प्रमाणित केलेला अनाथाचा दाखला (स्कॅन प्रत)
  12. नॉन-क्रीमीलेयर दाखला (सारथी व महाज्योती योजनांसाठी आवश्यक) – मूळ प्रमाणपत्राची स्कॅन प्रत

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  : 20 ऑगस्ट 2025

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *