महिलांसाठी मोठी संधी! मिळवा ₹15 लाख Business Loan, तेही बिनव्याजी!

मित्रांनो आपल्या कुटुंबाला भरभक्कम आधार देण्याकरिता प्रत्येक आई मध्ये आणि प्रत्येक महिलेमध्ये एक यशस्वी उद्योजिका दडलेली असते आणि याच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र सरकारने एक खास योजना सुरू केली आहे जेणेकरून महिला आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनतील तर योजनेचे नाव आहे आई महिला पर्यटन धोरण ज्याला आपण Aai Karj Yojana म्हणून देखील ओळखतो.

तर या योजनेचे मुख्य उद्देश अगदी सोपे आहेत ज्या महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये जसे की हॉटेल रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स एजन्सी असे इत्यादी व्यवसाय सुरू करायचे आहेत अशा महिलांना महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.

आणि महत्त्वाचं म्हणजे आई कर्ज योजनेअंतर्गत महिलांना तब्बल 15 लाख रुपये पर्यंतचे आर्थिक कर्ज मिळू शकते आणि यामध्ये विशेष बाब म्हणजे या कर्जावर व्याज देखील पडत नाही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकार स्वतः तुमच्या कर्जाचे व्याज भरते म्हणजेच असं समजा की आई कर्ज योजना ही एक बिनव्याजी कर्ज योजना आहे जी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची एक मोठी संधी देते.

तर आता तुम्हाला देखील आई कर्ज योजनेविषयी आणखी सविस्तर माहिती मिळवायची असेल या योजनेचा अर्ज कसा करायचा योजनेसाठी लागणारी पात्रता काय आहे? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून हा सविस्तर लेख शेवटपर्यंत वाचा.

आई कर्ज योजना (overview)

घटकमाहिती
योजनेचे नाव‘आई’ महिला पर्यटन धोरण (आई कर्ज योजना’)
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार (पर्यटन संचालनालय)
मुख्य लाभार्थीमहिला उद्योजिका (विशेषतः पर्यटन क्षेत्रातील)
मुख्य उद्देशमहिलांना पर्यटन व्यवसायात आणणे, प्रोत्साहन देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.
लाभाचे स्वरूप15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज परतावा (बिनव्याजी कर्ज).
अधिकृत वेबसाईटaai-portal.maharashtratourism.gov.in
महिला उद्योजिकांसाठी कर्ज मिळविण्यासाठी लागणारा अर्ज

आई कर्ज योजना काय आहे?

Aai Karj Yojana ही महाराष्ट्र सरकारने खास महिलांकरिता सुरू केली आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या योजनेचे अधिकृत नाव आई महिला केंद्रित पर्यटन धोरण असे आहे. तर या योजनेअंतर्गत ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना महाराष्ट्र सरकारकडून बिनव्याजी कर्ज मिळते म्हणजेच यामध्ये सरकार थेट तुम्हाला कर्ज देत नाही तर तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून जे तुम्ही 15 लाख रुपये कर्ज घेता तर त्या कर्जावर लागणारे संपूर्ण व्याज हे महाराष्ट्र सरकार स्वतः भरते.

आता मी तुम्हाला एक सोपा उदाहरण देतो: तर बघा जर तुम्ही बँकेकडून दहा लाख रुपये कर्ज घेतले असेल आणि त्यावरती वर्षाला व्याज हे एक लाख रुपये झाले असेल तर तुम्ही बँकेला कर्जाचे हप्ते भरल्यानंतर हे एक लाख रुपये व्याज परतावा म्हणून सरकार थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करते यामुळे तुम्हाला फक्त कर्जाची रक्कम परत करावी लागते त्यावरील व्याज नाही.

आई कर्ज योजनेची उद्दिष्टे

  • या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बळवले जाते जेणेकरून महिला त्यांच्या कुटुंबाचा तसेच स्वतःचा भार पेलू शकतील.
  • या योजनेचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे महिलांना उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देणे कारण महिलांना केवळ नोकरी करणाऱ्या न ठेवता त्यांना उद्योजिका बनवण्यासाठी प्रेरित करणे.
  • व्यवसायासाठी लागणाऱ्या कर्जाचा बोजा कमी करण्याचे काम ही योजना करते म्हणजेच महिलांनी तर कर्ज घेतलं तर त्या कर्जावरील व्याज हे सरकार मार्फत दिले जाते म्हणजेच तुम्ही बिनधास्तपणे कर्ज घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.
  • या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते जेणेकरून नवीन व्यवसायामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

हा लेख नक्की वाचा: बांधकाम कामगार योजना फक्त एक योजना आणि 30 पेक्षा जास्त फायदे

आई कर्ज योजनेचे पात्रता व निकष

  • या योजनेकरिता अर्जदार महिलाही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे कारण ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात, म्हणजेच अर्जदार हे फक्त महिला असणे बंधनकारक आहे.
  • तुमचा पर्यटन व्यवसाय हा महाराष्ट्र सरकारच्या Directorate of Tourism मध्ये Registered असणे आवश्यक आहे.
  • हा लाभ फक्त होम-स्टे, हॉटेल, रेस्टॉरंट, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजन्सी, कॅफे, हस्तकला विक्री केंद्र इत्यादी या संबंधित क्षेत्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या महिलांनाच दिला जातो.
  • महत्त्वाचं म्हणजे आई कर्ज योजनेचे पैसे थेट तुम्हाला मिळत नाही अर्जदार महिलेने तिचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी मान्यता प्राप्त बँकेकडून 15 लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेतलेले असावे. फक्त या कर्जावरील व्याज सरकार भरत असते.
  • जर तुमचा व्यवसाय हॉटेल किंवा रेस्टॉरंटचा असेल तर तुमच्या हॉटेलमधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी किमान 50% कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
  • जर तुमचा व्यवसाय हा टूल्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचा असेल तेथे देखील किमान 50 टक्के कर्मचारी महिला असणे अनिवार्य आहे.

NOTE: महिलांनो या योजनेमध्ये वयाची किंवा कौटुंबिक उत्पन्नाचे कोणतीही विशेष अट अधिकृत धोरणांमध्ये नमूद केलेली नाही या योजनेचा मुख्य भर हा फक्त महिला उद्योजिका आणि पर्यटन व्यवसायावर आहे.

आई कर्ज योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक लाभ

तर बघा या योजनेअंतर्गत अनेक लाभ मिळतात तर त्या लाभांमधील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा आर्थिक लाभ म्हणजे व्याजाचा परतावा याचा अर्थ असा होतो की तुम्ही बँकेकडून घेतलेल्या रकमेवरती तुम्हाला व्याज द्यावे लागत नाही कारण ते व्याज महाराष्ट्र सरकारच्या मार्फत भरण्यात येते.

  • तुम्ही या योजनेअंतर्गत पर्यटन व्यवसाय करण्यासाठी मान्यताप्राप्त बँकेकडून जास्तीत जास्त 15 लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेऊ शकता.
  • या 15 लाखावर जे सुद्धा व्याज लागेल ते सरकारच्या वतीने भरण्यात येईल.
  • जेव्हा तुम्ही बँकेकडून व्याज घेता तेव्हा बँकेच्या नियमाप्रमाणे तुमच्यावर दहा ते बारा टक्के व्याजदर आकारले जाते. पण योजनेच्या नियमांप्रमाणे हे व्याज सरकारमार्फत भरण्यात येते.

NOTE: सरकार जास्तीत जास्त 12 टक्क्यापर्यंत व्याजाचा परतावा देत असते तसेच हा व्याजाचा परतावा तुम्हाला जास्तीत जास्त सात वर्षापर्यंत मिळू शकतो तसेच संपूर्ण कर्ज कालावधीत सरकार तुम्हाला जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये इतकी व्याजाची रक्कम परत करते.

बघा मी तुम्हाला आता एक सोपे उदाहरण देतो: समजा तुम्ही तुमच्या भागात हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून 15 लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेतले आणि त्याची मर्यादा 7 वर्ष अशी असली आणि जर बँकेने तुम्हाला 12% टक्के पर्यंत व्याजदर लावला तर बँकेला दर महिन्याला कर्जाचा हप्ता म्हणजेच मुद्दल आणि व्याज वेळेवर द्यावे लागत. म्हणजेच जी तुम्ही सात वर्षांमध्ये 4.5 लाख रुपये (अंदाजे) व्याजाचे रक्कम भरली. करती रक्कम महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन संचालनालय विभागामार्फत तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.

म्हणजेच तुमच्यावर कर्जाचा कोणताही बोजा पडणार नाही फक्त तुम्हाला बँकेकडून घेतलेली मूळ रक्कम म्हणजेच 15 लाख रुपये परत करावे लागतील त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक प्रकारे बँकेकडून तुम्हाला बिनव्याजी कर्ज दिले जाईल.

हे नक्की वाचा: लेक लाडकी योजना तुमच्या लाडक्या मुलींना महाराष्ट्र सरकार मार्फत 1 लाख रुपये पर्यंतची स्कॉलरशिप

आई कर्ज योजनेचा अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराची वैयक्तिक कागदपत्रे

  • आधार कार्ड – अनिवार्य
  • पासपोर्ट
  • वाहन चालक परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • पॅन कार्ड – अनिवार्य
  • पासपोर्ट आकारातील फोटो

अर्जदाराच्या व्यवसायाची कागदपत्रे

  • उद्योग नोंदणी प्रमाणपत्र
  • महिलेच्या नावावरील ७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड किंवा ८-अ नमुना (जर जागा स्वतःची असेल)
  • नोंदणीकृत भाडे करार (जर जागा भाड्याने असेल)

तसेच तुम्हाला तुमच्या व्यवसायाची संकल्पना लिहून द्यायची आहे म्हणजेच तुमचा व्यवसाय काय आहे तुम्ही तो कसा करणार आहात याची सर्व माहिती देणारा एक संक्षिप्त प्रकल्प अहवाल मला साधारणपणे 500 शब्दांमध्ये लिहून द्यायचा आहे.

  • प्रमाणपत्र म्हणजेच जीएसटी चे बिल (पण जर तुमच्या व्यवसायाला लागू असेल तर)
  • अन्न परवाना (जर तुमचा व्यवसाय हॉटेल कॅफे रेस्टॉरंट होम किचन अशा अन्नपदार्थांची संबंधित असेल तर अन्न परवाना अनिवार्य आहे)

कायदेशीर आणि आर्थिक कागदपत्रे

  • एक प्रतिज्ञापत्र हा व्यवसाय पूर्णपणे महिलेच्याच मालकीचा आहे आणि तिच्याद्वारे चालवला जातो असे 100/- रुपयांचा स्टॅम्प घेऊन लॉटरी केलेले Affidavit अनिवार्य आहे.
  • तुमच्या व्यवसायामध्ये 50% महिला कर्मचारी असल्याचे तुम्हाला प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करावे लागेल.
  • ज्या बँक खात्यावर तुम्हाला व्याजाची रक्कम परत मिळवायची आहे , त्या बँक खात्याचा एक Cancelled Cheque केलेला चेक (हे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक (Aadhaar Linked) असणे अनिवार्य आहे.)
  • बँकेकडून 15 लाखापर्यंतचे कर्ज मंजुरीचे पत्र.
  • तुमच्या बँक खात्यातील लोन अकाउंट चे स्टेटमेंट.
  • https://gras.mahakosh.gov.in/echallan/ या शासकीय वेबसाईटवर ₹ 50/- (पन्नास रुपये) अर्ज प्रक्रिया शुल्क भरल्याची चलनाची प्रत.
  • सर्वात महत्त्वाचे: तुमचा व्यवसाय भारत सरकारच्या nidhi.tourism.gov.in या पोर्टलवर नोंदणीकृत (Registered) असणे आवश्यक आहे.

आई कर्ज योजनेची अर्ज प्रक्रिया (Step-by-Step)

  • आई कर्ज योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र पर्यटनाच्या अधिकृत https://aai-portal.maharashtratourism.gov.in/ आई पोर्टल वरती भेट द्यायची आहे.
  • या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आई रजिस्टर म्हणजेच नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • तिथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि तुमच्या प्रस्तावित पर्यटन व्यवसायाची माहिती उदाहरणार्थ होम-स्टे, हॉटेल किंवा कॅफे या व्यवसायाची माहिती भरून नोंदणी करायची आहे.
  • तुमची नोंदणी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला पर्यटन संचालनालयाकडून Primary Registration Certificate मिळेल ते जपून ठेवा.

बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून घेणे

  • आता व्यवसायिक कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मान्यता प्राप्त बँकेमध्ये कर्जासाठी अर्ज करायचा आहे.
  • बँकेला तुमचा प्रकल्प अहवाल म्हणजेच आई पोर्टलचे नोंदणी प्रमाणपत्र आणि इतर अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती कागदपत्रे द्यायची आहेत.
  • आता बँकेकडून तुमच्या अर्जाची आणि प्रकल्पाची तपासणी केली जाईल आणि जर सर्व योग्य असेल तर तुमचे 15 लाखाचे कर्ज मंजूर केले जाईल.
  • कर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला Loan Sanction Letter बँके कडून दिले जाईल.

व्याज परताव्यासाठी पर्यटन संचालनालयाकडे अर्ज करणे

आता या अर्ज प्रक्रियेमधील व्याजाचा परतावा परत मिळवण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे कारण आता तुम्हाला सरकारला सांगावे लागेल की “माझे कर्ज मंजूर झाले आहे” कृपया मला आई कर्ज योजने अंतर्गत व्याजाचा परतावा सुरू करा.

  • तर आता हा व्याजाचा परतावा परत मिळवण्याकरिता तुम्हाला Interest Reimbursement अर्ज मिळवावा लागेल हा अर्ज तुम्हाला Directorate of Tourism याच्या अधिकृत वेबसाईट वरती पीडीएफच्या स्वरूपात मिळतो.
  • आता हा भरलेला अर्ज आणि मागील टप्प्यामध्ये सर्व सांगितलेले आवश्यक ती कागदपत्रे जसे की तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड व्यवसायाचा पत्ता पालखी हक्काचे प्रतिज्ञापत्र, तसेच बँक कर्ज मंजुरी पत्र आणि इत्यादी कागदपत्रे आमच्या सोबत जोडा.
  • त्यानंतर अर्ज जमा करण्यासाठी उपसंचालक (Deputy Director), पर्यटन संचालनालय तुमचा जिल्हा ज्या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येतो, त्या प्रादेशिक कार्यालयात (Regional Office) या कार्यालयांना भेट द्या. कारण हा अर्ज तुम्हाला या कार्यालयांना भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांकडे सादर करावा लागेल.

आई कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करताना या चुका करू नका

  • तुमची सर्वात मोठी चूक तर बघा ही योजना फक्त टुरिझम क्षेत्रातील संबंधित व्यवसायासाठी सुरू करण्यात आली आहे जसे की हॉटेल, कॅफे, कृषी पर्यटन, ट्रॅव्हल्स एजन्सी अशा प्रकारचे व्यवसाय आता अनेक महिला इतर व्यवसायासाठी जसं की ब्युटी पार्लर, शिवणकाम, दुकान अशा प्रकारच्या व्यवसायासाठी अर्ज करतात तर तुमचा अर्ज थेट ना मंजूर होऊ शकतो म्हणूनच अर्ज करण्यापूर्वी तुमचा व्यवसाय पर्यटन विभागाच्या यादीमध्ये येतो का याची खात्री नक्की करा.
  • अनेक महिला आधी बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज घेतात त्यानंतर सरकारी पोर्टल वरती नोंदणी करण्याचा प्रयत्न करतात तर बघा महिलांना या योजनेच्या अर्ज प्रक्रियेचा योग्य क्रम लक्षात ठेवा सर्वात आधी तुम्हाला आई पोर्टल वरती व्यवसायाची नोंदणी करावी लागेल त्यानंतर बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कर्जाच्या व्याजाची रक्कम परत मिळवण्यासाठी पर्यटन संचालनालयाच्या कार्यालयामध्ये हा अर्ज जमा करा.
  • अनेक महिलांना वाटते की संपूर्ण प्रक्रिया हे फक्त ऑनलाईनच आहे आई पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर आपले काम संपले असं समजू नका कारण लक्षात ठेवा ऑनलाइन पद्धत ही फक्त प्राथमिक नोंदणी करण्यासाठी असते त्यानंतर बँकेमध्ये कर्ज मंजूर झाल्याबद्दल व्याजाचा परतावा परत मिळवण्यासाठी बँकेची कागदपत्रे आणि इतर पुरावे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या विभागातील पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने जमा करावी लागतात.
  • महिलेच्या मालकी हक्काचे प्रतिज्ञापत्र नसणे म्हणजेच तुमचा व्यवसाय शंभर टक्के महिलेच्या मालकी हक्काचा आहे हे सिद्ध करणारा कायदेशीर पुरावा न जोडणे असे करणे टाळा कारण अर्ज करताना शंभर शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र तयार करणे अनिवार्य आहे आणि यामध्ये स्पष्ट लिहा की हा व्यवसाय पर्यटन विभागाशी संबंधित आहे आणि तो पूर्णपणे महिलेच्या मालकीचा आहे.

महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन

माहितीचा प्रकारतपशील (Details)
‘आई’ योजनेचे मुख्य पोर्टलhttps://aai-portal.maharashtratourism.gov.in/
मुख्य पर्यटन विभागाची वेबसाईटhttps://maharashtratourism.gov.in/
महिला कर्ज अर्ज व जी.आर. PDFhttps://aai-portal.maharashtratourism.gov.in/wp-content/uploads/2024/02/AAI-Policy.pdf
मुख्य ईमेल आयडीdiot@maharashtratourism.gov.in
हेल्पलाइन (मुख्यालय)०२२-६९१०७६०० (सकाळी १० ते संध्याकाळी ६)
अर्ज जमा करण्याचे ठिकाणपर्यटन संचालनालयाचे संबंधित प्रादेशिक कार्यालय (उदा. पुणे, नाशिक, नागपूर, नवी मुंबई इ.)

महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आई कर्ज योजना’ म्हणजे नेमके काय आहे? यात पैसे मिळतात का?

तर बघा ही योजना थेट कर्ज किंवा सबसिडी देत नाही कारण काही कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला सर्वात आधी पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून 15 लाख रुपये पर्यंतचे कर्ज घ्यावे लागतात आणि त्या कर्जावरील व्याज सरकार भरत असते फक्त तुम्ही जे बँकेकडून हप्ते भरता त्या वाजाची रक्कम सरकारमार्फत तुमच्या हातामध्ये जमा करण्यात येते. थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्हाला बँकेकडून बिनव्याजी कर्ज दिले जाते.

या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?

ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे या महिलांना उद्योग करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे संबंधित जर उद्योग करायचा असेल तर अशा महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात पण अट एवढीच आहे तो व्यवसाय पूर्णपणे महिलेच्या मालकीचा असावा तसेच महिले कडूनच चालवला जाणारा असावा.

सर्वच व्यवसायांसाठी ही योजना लागू आहे का?

नाही ही योजना फक्त पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसायांसाठी लागू करण्यात आली आहे यामध्ये प्रमुख्याने होम-स्टे (Home Stay), बेड अँड ब्रेकफास्ट (B&B), हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे, कृषी-पर्यटन केंद्र, ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर किंवा पर्यटकांशी संबंधित इतर नोंदणीकृत व्यवसायांचा समावेश होतो.

Check Also

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना

⬛️  कोणाला लाभ घेता येणार? महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/तरुणींना दिला जाईल. ⬛️ काय …

1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार 8000 रुपये, पालकांनो आजच अर्ज करा

जर तुमच्या घरात देखील इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणारे मुले असतील आणि तुम्ही एससी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *