
जालना जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, जालना, अंबड, भोकरदन, परतूर यांच्या आस्थापनेवरील पोलीस पाटील पदांच्या एकूण ७२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस पाटील पदांच्या ७२२ जागा
जालना उपविभागात १८५ जागा, अंबड उपविभागात १८३ जागा, परतूर उपविभागात १५३ जागा आणि भोकरदन उपविभागात २०१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी (एसएससी) परीक्षा उत्तीर्ण आणि स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी किमान २५ वर्ष आणि कमाल ४५ वर्ष दरम्यान असावे.
प्रवेशपत्र – दिनांक ६ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान डाऊनलोड करता येतील.
परीक्षा – दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्यात येईल.
अर्ज शुल्क – खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये तर आरक्षित/ दुर्बलघटक प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs