मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

योजनेची ठळक वैशिष्टे
  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
  • सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
  • अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5 टक्के
  • उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
  • जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 एचपीचे पंप
  • पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
  • वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
  • सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
लाभार्थी निवडीचे निकष
  • 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
  • ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
  • अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2 व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.
जमिनीच्या क्षेत्रानुसार दिला जाणारा पंप 
HPDCआवश्यक भू-धारणाक्षेत्र
3 HP2.5 एकरापर्यंत
5 HP2.51 ते 5 एकरापर्यं
7.5 HP5 एकरा पेक्षा जास्त
लाभार्थ्यांनी भरायचा हिस्सा / रक्कम 
HPDCSC-ST प्रवर्ग रक्कम (5%रक्कम)इतर प्रवर्ग रक्कम (10%रक्कम)
3 HP11486/-22971/-
5 HP16038/-32075/-
7.5 HP22464/-44928/-
आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज फोटो
  • 7/12 उताऱ्यावर विहिर किंवा कुपनलिका नोंद आवश्यक 

Check Also

(INDIAN ARMY AGNIVEER) भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026

भारतीय सैन्यदळ अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र. नमूद नाही एकूण जागा पद संख्या नमूद नाही …

UPSC IFS Bharti 2026: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC भारतीय वन सेवा परीक्षा 2026 जाहिरात क्र. 06/2026-IFS एकूण जागा 80 नोकरी ठिकाण संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *