
विभाग : समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन
योजनेचे नाव : मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना
⬛️ योजना राबविणे मागची उद्दिष्टे :
मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत.
⬛️ लाभार्थी पात्रता & अटी व शर्ती :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील अटी व शर्ती लागू असतील
1. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
3. प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न रु. 2,50,000/- पेक्षा जास्त नसावे.
4. इयत्ता ८ वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
5. सन २०१४ -१५ पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात जागेपैकी १०% प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा ह्या खासबाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरून व गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आणि ५% खासबाब म्हणून अनाथ तसेच मांग भंगी, मेहकर या जातीतील लाभार्थ्यांसना प्राधान्य् देण्यात येते.
⬛️ योजनेचे लाभाचे स्वरूप :
1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हास इ.
5. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता सुद्धा दिला जातो.
- विभागीयस्तर – रुपये 800/-
- जिल्हास्तर – रुपये 600/-
- तालुकास्तर – रुपये 500/-
- या व्यतिरिक्त मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठी दरमहा – रुपये 100/- अदा करण्यात येते.
⬛️ आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- जन्मदाखला
- रेशन कार्डची झेरॉक्स
- जातीचा दाखला – असेल तर
- अपंगत्वाचा दाखला – असेल तर
- प्रवेश शुल्क पावती
- रहिवाशी प्रमाणपत्र
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs