शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची भरती!! – 3,000 Veterinary Positions to be Filled Soon in Government Veterinary Colleges!!

अकोला, सांगली, बारामती आणि परभणी येथे नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालये मंजूर करण्यात आली आहेत. या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुल्कवाढ होणार नाही. तसेच खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांसाठीही शुल्क नियमन प्राधिकरणामार्फत शुल्क निश्चित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, खासगी महाविद्यालयांना परवानगी देताना शासनाने कठोर निकष लागू केल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील पशुवैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी सरकारने श्रेणी-१ पशू रुग्णालयांमध्ये पदवीधारक पशुवैद्यक असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ३,००० हून अधिक पशुवैद्यकांची आवश्यकता भासणार आहे. पशुवैद्यकीय परिषद अधिनियमाच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे पशुधनासाठी अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होतील.

शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थितीबाबत विधानपरिषद सदस्य अरूण लाड यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी एकनाथ खडसे, सदाभाऊ खोत आणि अभिजित वंजारी यांनीही उपप्रश्न विचारले. राज्यातील पशुवैद्यकीय शिक्षण आणि पशुसंवर्धन व्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा अयोग: संयुक्त पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ही परीक्षा दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर घेण्यात …

(MAHARASHTRA POLICE BHARTI) महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र सरकारने अखेर पोलीस भरती 2025 जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून भरती रखडलेली असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *