
राज्यात तब्बल वीस वर्षांनंतर गेल्या वर्षी शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाने तब्बल ११,०८५ नवीन शिक्षकांची भरती जाहीर केली होती. त्यामुळे अनेक उमेदवारांची दीर्घ प्रतीक्षा संपली. ही भरती ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’च्या आधारावर पवित्र पोर्टलमार्फत पार पडली. पहिल्या टप्प्यात २१,६७८ जागांपैकी १६,७९९ पदे मुलाखतीशिवाय भरली जाणार होती, त्यापैकी ११,०८५ उमेदवारांची निवड करण्यात आली.
मात्र, शाळांची बिंदूनामावली अद्ययावत नसल्याने आणि अनेक शाळांकडून पवित्र पोर्टलवर भरतीसंबंधी माहिती अद्याप अपलोड न झाल्याने दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे.
दुसऱ्या टप्प्यात मुख्यतः खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील रिक्त पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे. तसेच, ‘पेसा’ क्षेत्रातील ८,००० हून अधिक जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे अधिवेशनात मंजूर करून भरतीसाठी पवित्र पोर्टलवर सूचना द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे. सर्व व्यवस्थापनांमधील १००% रिक्त पदे भरती प्रक्रियेत समाविष्ट करावीत, यासाठी अधिवेशनात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्यास संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केली आहे.
भरती प्रक्रियेचे महत्त्वाचे आकडे:
पहिला टप्पा: ११,०८५ शिक्षकांची भरती पूर्ण
दुसरा टप्पा: १०,००० जागांवर भरती होण्याची शक्यता
swarajupdates.in Swaraj Updates | स्वराज अपडेट्स | | Latest Government Jobs